Congress candidate Akash More files nomination, turning Baramati bypoll into a contest against Sunetra Pawar. Saam tv
मुंबई/पुणे

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

Baramati Bypoll Is Not Unopposed: बारामती पोटनिवडणुक बिनविरोध होणार नाही...कारण काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना आव्हान दिलंय... मात्र त्यावरुन कसं राजकारण तापलंय..पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट....

Suprim Maskar

अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात होती...मात्र नाट्यमय घडामोडीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंशी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची शिष्टाई यशस्वी झाली.. आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली... मात्र याच दरम्यान काँग्रेसनं आकाश मोरेंना मैदानात उतरवून बिनविरोधच्या शक्यतेलाच सुरुंग लावलाय...

खरंतर अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती पोटनिवडणूक जाहीर झाली... ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीसोबतच पवारांच्या राष्ट्रवादीनंही जोरदार फिल्डिंग लावली..... सुनेत्रा पवारांनीही सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली... त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला.. मात्र काँग्रेसनं लोकशाही वाचवण्याचं कारण देत आपला उमेदवार मैदानात उतरवलाय.. यावरून काँग्रेस आणि राऊतांमध्ये जुंपली........

दुसरीकडे उमेदवार देणं हा काँग्रेसचा निर्णय आहे... त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असते, असं म्हणत पवारांनी सुनेत्रा पवारांना लढण्याचा सल्ला दिलाय...

खरंतर 2014 मध्ये आकाश मोरेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती...मात्र त्यांना अजित पवारांच्या विरोधात केवळ 4 हजार 13 इतकेच मतं मिळाले होते.. आताही काँग्रेसची ताकद नसतानाही काँग्रेसनं पुन्हा आकाश मोरेंना उमेदवारी दिलीय.. त्यामागंचं कारण विजयी होणं नसलं तरी लोकशाहीत पर्याय देण्याचा प्रयत्न करणं हा आहे...त्यात करुणा मुंडेंसह 54 उमेरवार रिंगणात आहे. मात्र 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत... त्यामुळे आता काँग्रेसच्या मनधरणीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश मिळणार का? आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ जाहीर केला मात्र अंमलबजावणी तातडीने करा, शेतकऱ्यांची मागणी

Maharashtra Drought: २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, सरकार काय उपाययोजना करणार? वाचा सविस्तर...

Political News : मोठी बातमी! शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

PF खातेदारांसाठी मोठी संधी! 28 सप्टेंबरला EPFO संदर्भातील अडचणी होणार दूर

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ

SCROLL FOR NEXT