by-election voting percentage साम टीव्ही
मुंबई/पुणे

bypoll election : बारामती-राहुरी पोट निवडणुकीत किती टक्के लोकांनी केलं मतदान? कोण मारणार बाजी?

by-election voting percentage : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांच्यावर सर्वांचे लक्ष असून निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra by-election voter turnout analysis : पश्चिम बंगालसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीची पोट निवडणूक लागली, तर राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दुखद निधनाने राहुरीमध्ये निवडणूक होत आहे. आयोगाने दिलेल्या अधिकृत आकेडवारीनुसार, महाराष्ट्रत सायंकाळी ६ पर्यंत बारामतीमध्ये ५९ टक्के, तर राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. तर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर अक्षय कर्डिले नशीब अजमावत आहेत.

राहुरी, बारामतीमध्ये किती टक्के मतदान झालं?

बारामती विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५९.२७ टक्के मतदान झाले. बारामतीमध्ये 384579 इतके मतदार आहेत, त्यापैकी 202808 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राहुरीमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.72 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बूथ क्रमांक 233 काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. त्याशिवाय जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 3 : स्वामी थेट अमेरिकेत पोहचणार, राघव शास्त्रीला भेटणार अन्...; 'देऊळ बंद ३' ची कथा काय? प्रवीण तरडेंनी दिली हिंट

Maharashtra News Live Update: नाशिकच्या सटाणा बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे आमरण उपोषण

Heart fatigue symptoms: पायांमध्ये 3 विचित्र लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय थकतंय

Fire Breaking: मोठी दुर्घटना! प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Jio Recharge: खुशखबर 200 रुपयांत मिळणार 30 जीबी टेडा अन् बऱ्याच सुविधा, लगेचच वाचा प्लान

SCROLL FOR NEXT