Banner hoisting against Raj Thackeray at Shiv Sena Bhavan premises रश्मी पुराणिक
मुंबई/पुणे

काल मुस्लिम, आज हिंदु उद्या कोण? राज ठाकरेंविरोधात शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी

Banners Against Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणारे बॅनर्स शिवसेना भवन परिसरात लागले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिलच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशीदीवरील भोंग्यांबाबात आक्षेप घेतला होता. भोंगा न उतरवल्यास मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलं होतं. यावरुन मविआ नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणारे बॅनर्स (Banner) शिवसेना भवन (Shivsena Bhavan) परिसरात लागले आहेत. यात राज ठाकरेंचा एक फोटो आहे, ज्यात त्यांनी मुस्लिम धर्मीयांची टोपी प्रधान केली आहे. दुसऱ्या फोटोत हनुमान असं लिहीण्याता आलंय, तर तिसऱ्या फोटोत प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले आहे. (Banner hoisting against Raj Thackeray at ShivSena Bhavan premises)

हे देखील पहा -

या बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंवर टीका करणारे हे बॅनर्स कुणी लावले याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र हे बॅनर्स शिवसेनेनेच लावले असावेत अशी चर्चा आहे. राज ठाकरेंच राजकारण आता हिंदुत्ववादी झालं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडाही बदलला. याशिवाय कोरोनाच्या दोन वर्षांनंतर त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी (२ एप्रिल २०२२) सभा घेतली त्यात त्यांनी मशीदींवरच्या भोंग्याबाबत भूमिका घेतली. त्यामुळे राज ठाकरेंचे याआधीचे फोटो मविआ नेत्यांनी शेयर केले होते. ज्यात राज ठाकरे हे मुस्लिम बांधवांची टोपी घातली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या भाषणांतून हिंदुत्वादी विचार मांडतात यावरुन ही टीका करण्यात आली आहे. त्यामुळेच काल मुस्लिम, आज हिंदु आणि उद्या कोण अशा आशयाचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरे आक्रमक :

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT