Pune Traffic  
मुंबई/पुणे

Pune Traffic : बाणेर-मोहननगर परिसरात वाहतूक कोंडीचा विळखा, महापालिकेचे दुर्लक्ष

Pune traffic jam : पुण्यातील बाणेर-मोहननगर परिसरात खड्डे, आठवडी बाजार आणि बेशिस्त पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी होते आहे. PMC आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त असून त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

Pune traffic jam, Baner Mohannagar congestion : बाणेर-मोहननगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठवडी बाजार, रस्त्यांवरील खड्डे, अरुंद रस्ते आणि वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे या भागात दररोज वाहतूककोंडी होत आहे. दररोजच्या वाहतूककोंडीमुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी पुणे महानगरपालिका (PMC) आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

बाणेर येथील कै. नारायण वाडकर चौकापासून मोहननगरकडे जाणारा रस्ता सुस, नांदे, लवळे, मुळशीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर सततची रहदारी आणि वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आठवड्यातून तीन वेळा भरणारा आठवडी बाजार आणि रस्त्याकडेला असलेल्या पाणीपुरी, भेळ, चहाच्या पथाऱ्यांमुळे खवय्यांची गर्दी वाढते. बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. स्थानिक सोसायटीतील रहिवाशांना घरी जाण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागतो.

सततच्या खोदकामामुळे रस्त्यावर चढ-उतार निर्माण झाले असून, अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री दुचाकीस्वार घसरून पडतात. या समस्यांमुळे नागरिक संतप्त असून, रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे सुरू करणे आणि वाहतूक नियमनासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वारंवार सांगूनही मनपाकडून कोणत्याही उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

मोहननगर, सुस, आणि बालेवाडी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्ते अधिकच धोकादायक बनले आहेत. याशिवाय, बाणेर रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बाणेर-मोहननगर परिसरातील राधा चौक हा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे. येथे वाहतूक पोलिसांची कमतरता आणि सिग्नल यंत्रणेचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. स्थानिक रहिवासी संघटनेने याबाबत वारंवार तक्रारी केल्या असून, रस्त्यांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा बसवणे आणि वाहतूक नियमनासाठी पोलिसांची नियुक्ती यासारख्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT