Bandra Worli Sea Link  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास आजपासून महागणार, वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलच्या दरात वाढ

Bandra Worli Sea Link : नव्या टोल दरांनुसार, कार आणि जीपसाठी एकेरी प्रवासासाठी आजपासून १०० रुपये टोल असणार आहे. जो यापूर्वी ८५ रुपये होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Toll News :

वांद्रे वरळी सी लिंकवर आजपासून प्रवास करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास करण्यासाठी अधिकचा टोल भरावा लागणार आहे. तीन वर्षांनी टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. जवळपास १८ टक्के ही टोल वाढ असणार आहे. यामुळे मुंबईकरांच्या खर्च वाढणार आहे.

नव्या टोल दरांनुसार, कार आणि जीपसाठी एकेरी प्रवासासाठी आजपासून १०० रुपये टोल असणार आहे. जो यापूर्वी ८५ रुपये होता. तर मिनी बस, टेम्पो आणि त्या प्रकारातील इतर वाहनांसाठी १६० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी या वाहनांवर १३० रुपये द्यावे लागत होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टू-एक्सल ट्रकसाठी २१० रुपये टोल आकारला जाईल. ज्यासाठी याआधी १७५ रुपये द्यावे लागत होते. वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल शुल्काचे नवीन दर आज म्हणजेच १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. तर हे दर ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहतील.

वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलची अॅडव्हान्स ५० कूपन घेणाऱ्या वाहनधारकांना १० टक्के एवढी सूट मिळणार आहे. तर १०० कूपन खरेदी केल्यास टोलच्या एकूण रकमेवर २० टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तसेच मासिक पासही सवलतीत मिळेल, असं एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

SCROLL FOR NEXT