LPG Cylinder Prices : महागाईत दिलासा; एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, चेक करा नवीन दर

LPG Cylinder New Prices : नव्या दरांनुसार, मुंबई व्यावसायिक सिलिंडर आता, १७१७.५० रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत त्याची किंमत आता १७६४.५० रुपये झाली आहे.
LPG Cylinder
LPG CylinderSaam TV

Cylinder Price News :

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सिलिंडरच्या किंमतीत ३०.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

नव्या दरांनुसार, मुंबई व्यावसायिक सिलिंडर आता, १७१७.५० रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत त्याची किंमत आता १७६४.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १७९५ रुपये होती. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर १८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १९३० रुपयांना मिळणार आहे. आजपासून कमी झालेले दर लागू झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील कपातीमुळे बाहेर खाणे आणि पिणे स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

LPG Cylinder
Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1 एप्रिलपासून बदलणार 'हा' विशेष नियम

याआधी १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात सलग दोन महिने वाढ करण्यात आली होती. १ मार्च रोजी त्याची किंमत १७६९.५० रुपयांवरून १७९५ रुपयांपर्यंत वाढवली होती. १ फेब्रुवारीला त्यात १४ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर १ जानेवारीला त्याची किंमत १.५० रुपयांनी कमी करण्यात आली होती.

घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही

घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई घरगुती वापरण्यासाठीचा सिलिंडर ८०२.५० रुपयांना मिळत आहे. दिल्लीत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती सिलिंडर उपलब्ध आहे.

LPG Cylinder
Discount Offers: स्मार्टफोन, एसी, वॉशिंग मशीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; उद्यापासून फ्लिपकार्टचा मोठा सेल सुरू

विमान इंधनाच्या किमतीतही घट

विमान इंधनाच्या किमतीही सरकारने कमी केल्या आहेत. विमान इंधनाच्या किमतीत सुमारे ५०२.९१ रुपये/किलोचा दिलासा मिळाला आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्यात किमती ६२४.३७ रुपये प्रति किलोग्रॅमने वाढल्या होत्या. हवाई इंधनाचे नवे दरही आजपासून लागू झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com