बंडातात्या कराडकर यांना फलटणला नेले? Saam Tv
मुंबई/पुणे

बंडातात्या कराडकर यांना फलटणला नेले?

बंडातात्या यांना संकल्प मंगल कार्यालयातुन फलटणच्या दिशेने घेऊन गेल्याची सुत्रांचीनी माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

पुणे : बंडातात्या कराडकर Bandatatya Karadkar यांच्या पायीवारीच्या भूमिकेशी वारकरी ठाम आहेत. मात्र बंडातात्यांना अज्ञात स्थळी घेऊन गेल्याने वारकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडातात्या यांना संकल्प मंगल कार्यालयातुन फलटणच्या दिशेने घेऊन गेल्याची सुत्रांचीनी माहिती दिली आहे. राज्यातील कोरोनाची Corona दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे असे असले तरी कोरोनाची तिसरी लाट राज्याच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहे.

सरकारने Government आषाढी वारीसाठी Wari नियमावली जारी केली आहे आणि त्यानुसार पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात Pandharpur वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच सरकारचा हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे काल बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले असता पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

सुरवातीला दिघी येथील संकल्प मंगल कार्यालयात बंडातात्या कराडकर यांना ठेवण्यात आले होते. त्यानंतर वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने संकल्प मंगल कार्यालय परिसरात दाखल झाले होते. त्यानंतर महेश लांडगे यांनी बंडातात्या कराडकर यांची भेट घेतली होती. आता त्यांना फलटण येथे नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी कडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT