विम्याची रक्कम लाटण्यासाठी रुग्णालयातून गोळा केला जातो कोरोना पॉझिटिव्ह स्वॅब?

खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाची टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यात १५ दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार राज्यातील अनेक शहरांमध्ये उघडकीस आले आहे.
विम्याची रक्कम लाटण्यासाठी रुग्णालयातून गोळा केला जातो कोरोना पॉझिटिव्ह स्वॅब?
विम्याची रक्कम लाटण्यासाठी रुग्णालयातून गोळा केला जातो कोरोना पॉझिटिव्ह स्वॅब?संजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा - खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाची Corona टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यात १५ दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार राज्यातील अनेक शहरांमध्ये उघडकीस आले आहे. असाच एक प्रकार बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील खामगाव Khamgaon शहरात उघडकीस आला आहे. या ठिकाणी एमआयडीसी मधील पार्ले कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना निगेटिव्ह असतांना पॉझिटिव्ह दाखवून त्यांना लाखोंचा विमा आणि इतर सुविधा मिळवून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश खुद्द रुग्णालय प्रशासनानेच केला आहे. या प्रकरणी पोलिसात Police तक्रार देण्यात आली असून रुग्णालयातील एका कंत्राटी वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. Corona positive swab is collected from the hospital to defraud the insurance amount

हे देखील पहा -

खामगाव शहरात एमआयडीसी मधील पार्ले कंपनीमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत असून या कंपनीमधील कर्मचारी जास्त प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती खामगाव येथील उपजिल्हा प्रशासनाला समजल्यावरून त्यांना याबाबत शंका आली. त्यांनी याबाबत पाळत ठेवली असता पॉझिटिव्ह रुग्ण ज्या वॉर्डात भरती आहेत . त्या वॉर्डात तपासणी केली असता रुग्णांनी नाकात दुखत असलयाचे सांगितले. याबाबत विचारपूस केली असता एक इसमाने सर्व रुग्णांचे नमुने पुन्हा नेल्याचे समजले सुरक्षा रक्षकाडून विचारपूस केली असता विजय राखोंडे नामक कर्मचारी येऊन गेला असल्याचे समजल्यावरून राखोंडे याला रुगणांसमोर हजर केले असता रुग्णांनी त्याला ओळखले.

विम्याची रक्कम लाटण्यासाठी रुग्णालयातून गोळा केला जातो कोरोना पॉझिटिव्ह स्वॅब?
आषाढी वारीसाठी विश्व वारकरी सेनेची दिंडी पंढरपूरकडे रवाना

दरम्यान, त्याने कबुली देत पार्ले कंपनीमधील चंद्रकांत उमाप रा. खामगाव हा आपल्याला प्रत्येक स्वॅब मागे ५ हजार देणार होता अशी कबुली दिल्यावरून निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश टापरे यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसंनी या प्रकरणी कंत्राटी वॉर्ड बॉयला अटक केली असून चंद्रकांत उमाप हा आरोपी फरार आहे. विमा मिळविण्यासाठी सुरु असलेला हा खेळ किती दिवसांपासून सुरु होता, आणि यात कोणकोण सहभागी आहे हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com