maval , bail pola saam tv
मुंबई/पुणे

Bail Pola In Maval : बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आला नवा शासन निर्णय

शासन निर्णयाप्रमाणे गावोगावी दवंडीद्वारे याची माहिती पाेहचविण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

दिलीप कांबळे

Bail Pola In Maval : राज्यासह मावळात बैल पोळा (bail pola) हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. मावळ येथे बैल पोळा हा येत्या रविवारी (ता. 25) आहे. त्याकरिता मावळातील बैलप्रेमी, शेतकऱ्यांनी बैल पोळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान 'लम्पी' (lumpy disease) च्या पार्श्वभुमीवर शासनाने मिरवणुकीवर बंदी घातली आहे. त्याबाबतचा आदेश नुकताच काढण्यात आला आहे. (maval latest marathi news)

देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील लम्पी स्कीन या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र राज्य देखील लम्पी स्कीन बाबत नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. लम्पी स्कीन हा आजार गोवंशीय पशूधनात आढळून येत आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शासन स्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्यासह मावळात बैल पोळा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. मावळ मध्ये भाद्रपद बैल पोळा हा रविवारी म्हणजे येत्या पंचवीस तारखेला आहे. त्याकरिता मावळातील अनेक बैलप्रेमी, शेतकऱ्यांनी बैल पोळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र शासनाने बैल पोळा सण साजरा करण्यावर काही निर्बंध लावले आहेत.

या सणाच्या दिवशी बैलांना सजवून एकत्र आणले जातात. बैलांची मिरवणूक काढली जाते. तसेच बैल घाटात बैल एकत्र आणून त्यांची पूजा केली जाते. लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा सणाच्या दिवशी चर्मरोगाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना एकत्र आणून मिरवणूक काढण्यावर शासनाने बंदी घातली आहे.

याबाबतचा आदेश मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी जारी केला आहे. दरम्यान सर्व मावळातील गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांच्या नावे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे गावोगावी दवंडीद्वारे याची माहिती पाेहचविण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत अवैध गुटखा विक्रीवर अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

टीम इंडियाची चिंता वाढली! वेस्ट इंडिज संघात 'या' धडाकेबाज खेळाडूची अचानक वापसी; T20 आणि ODI मालिकेसाठी संघ जाहीर

Gold Price Today: सोन्याच्या दरात आठवडाभरात सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

Bollywood Actress : गुडन्यूज! प्रसिद्ध अभिनेत्री ४० व्या वर्षी झाली आई, गणेशोत्सवात घरी आली लक्ष्मी

Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना भयंकर घडलं! पाण्याचा अंदाज चुकल्याने बाप-लेक बुडाले

SCROLL FOR NEXT