मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला बाळा नांदगावकर यांचा नाव न घेता टोला... Saam Tv News
मुंबई/पुणे

मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला बाळा नांदगावकर यांचा नाव न घेता टोला...

मराठी भाषेला सन्मान मिळत नाही? का अभिजात भाषेचा सन्मान मिळत नाही? असे अनेक सवाल बाळा नांदगावकर यांनी केले.

प्रदीप भणगे

डोंबिवली : मनसे नेते अमित राज ठाकरे आज आणि उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दादर ते डोंबिवली लोकल प्रवास केला. रस्त्यांवर खड्डे , ट्रॅफिक मुळे त्यांनी लोकल प्रवास केला. तसेच अमित ठाकरे पुणे, नाशिक नंतर आता कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आल्याने मनसेची निवडणूकी तयारी सुरू झाली अशी चर्चा रंगू लागली आहे. (bala nandgaonkar slams to shivsena without mentioning their name about marathi language issue)

हे देखील पहा -

कल्याण-डोंबिवलीत विविध ठिकाणी पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या जात आहे. याबाबत मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले की, शाखा अध्यक्षांची आत्तापर्यंतची वाटचाल, काही त्रुटी आहेत का आणि त्याला पुढे कसे जात येईल, शेवटच्या मतदारपर्यंत त्याला कसे पोहोचता येईल त्या दृष्टीने बांधणी करत आहोत. दुसरीकडे मुंबईमधील भाजपाचे आमदार अमित साठम यांनी मराठी शाळा आणि मराठी भाषेचा विषय उचलला. मराठी शाळेच्या संख्येबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत चिंता व्यक्त केली. त्यानंतर डोंबिवलीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा पुन्हा एकदा मराठी विषयाला हात घालत सत्ताधारी शिवसेनेला नाव न घेता टोला हाणला आहे.

नांदगावकर यांनी सांगितले की इतके वर्षे मराठी मतं घेतली, सत्ता आपल्या हातात आहे, राज्य आपल्या हातात, एवढे सगळे ताब्यात असताना मराठीची गळचेपी का झाली? का मराठी भाषेला सन्मान मिळत नाही? का अभिजात भाषेचा सन्मान मिळत नाही? असे अनेक सवाल बाळा नांदगावकर यांनी केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT