Bajirao Peshwa Statue Controversy x
मुंबई/पुणे

Bajirao Peshwa Statue Controversy : आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा; मस्तानीच्या वंशजांचा दावा

Bajirao Peshwa statue In Pune : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमावर राणी मस्तानी यांच्या वंशजांनी बहिष्कार टाकला आहे.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे.या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिले तसेच व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले असून, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असून, आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी केला आहे.पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथील भासकुटे कुटुंबातून दत्तक घेतले गेले आहेत. त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांच्या रक्ताचे वंशज आहे, असा माझा ठाम दावा आहे. माझ्या पूर्वजांचा इतिहास गौरवशाली आणि बलिदानाने भरलेला आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या बाजूने लढा दिला होता आणि केवळ २७ व्या वर्षी त्यांनी वीरमरण पत्करलं. माझे पणजोबा नवाब अली बहादूर यांनी 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईंसोबत इंग्रजांविरुद्ध युद्ध लढलं, असे नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी म्हटले आहे.

मात्र, या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे ‘थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समिती’चे कुंदन कुमार साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी दत्तक वंशजांना मानाचं स्थान देत व्यासपीठावर आमंत्रित केलं, मात्र आम्हाला केवळ दोन दिवस आधी आमंत्रण देण्यात आलं आणि त्यातही व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचं स्पष्ट सांगण्यात आलं.

मला कार्यक्रमाविरोधात वैयक्तिक आक्षेप नाही. मात्र, इतिहास दडपण्याचा, खरा वारसा झाकण्याचा आणि गृहमंत्री अमित शहा यांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्री. शहा हे इतिहासप्रेमी आहेत आणि त्यांनी बाजीराव पेशव्यांवर पुस्तक देखील लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रकार दुर्दैवी आणि अनुचित आहे.

बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांचं प्रेम आणि त्याग हे भारतीय इतिहासात अमर आहे. आमचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या गौरवशाली वारशाचा सन्मान व्हावा ही आमची ठाम मागणी आहे. आम्हीच खरे रक्त वंशज असून, यासाठी डीएनए चाचणी करायला देखील आम्ही तयार आहोत. या अपमानाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर करतो' असे वक्तव्य नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलग दुसऱ्या दिवशी गणेशभक्तांचे हाल; मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Bhiwandi : गाडी पार्किंगवरून वाद; पोलिस हवालदाराला मारहाण, टोळक्याला अटक करत १ लाखांचा मुद्देमाल जप्त

Teachers Day Gifts : स्वस्तात मस्त ८ युनिक गिफ्ट आयडिया, शिक्षक होतील खुश

Pune Crime: पुणे हादरले! ऐन गणेशोत्सवात मुळशी पॅटर्न थरार, तरुणावर कोयत्याने सपासप वार; VIDEO व्हायरल

Amruta Deshmukh: अमृताचं मराठमोळं सौंदर्य! पैठणी साडीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT