wife killed husband  Saam tv
मुंबई/पुणे

बदलापूर हादरले! साडी दिली नाही म्हणून पत्नीने केली पतीची हत्या; डोक्यात कुकर मारून घोटला गळा

Badlapur wife kills husband over saree dispute : बदलापूरमध्ये साडीच्या वादातून पत्नीने अपंग पतीची प्रेशर कुकरने मारहाण करून गळा घोटल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Mayuresh Kadav

एका साडीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात उघडकीस आली आहे. पतीने साडी घेऊन दिली नाही या कारणावरून संतापलेल्या पत्नीने आधी पतीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारला आणि त्यानंतर गळा घोटून त्याला जिवे मारले. या भयंकर घटनेने संपूर्ण बदलापूर परिसर हादरून गेला. पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

पतीने साडी दिली नाही या रागातून पत्नीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरातील शिरगावात घडला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातल्या शिरगावात राहणाऱ्या हरेराम सिंग आणि सुनीता देवी यांच्यात वाद झाला. यावेळी त्यांचा सात वर्षांचा चिमुकला देखील घरातच होता. या वादाची सुरुवात पतीने साडी न दिल्यावरून होती अशी माहिती समोर येतीय. त्यानंतर सुनीतादेवीने हरेराम सिंग याच्या डोक्यात कुकर मारला आणि गळा घोटून हत्या केली असं प्राथमिक तपासात समोर आलंय. हरेराम हा अपंग असल्यामुळे तो अंथरुणावरच होता.

या दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याचं समोर आलय. सुरुवातीला आरोपी महिलेनं पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सात वर्षांच्या मुलाचा जबाब घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी सुनीतादेवीला अटक केलीय.

आता हा खून साडीच्या कारणावरूनच होती की, त्यामध्ये इतरही कोणती कारण आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. तसंच हरेरामच्या खुनामध्ये इतर कोणाचाही सहभाग आहे का? त्यावेळी घटनास्थळी कुणी उपस्थित होतं का? याचीही चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT