Pav Price Hike In Badlapur Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur News: बदलापूरमध्ये पाव महागला, २४ डिसेंबरपासून नवे दरवाढ लागू

Pav Price Hike In Badlapur: बदलापुरात येत्या २४ डिसेंबरपासून ही नवीन भाववाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे २४ तारखेपासून एका लादीसाठी २३ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा दर २० रुपये इतका होता.

Priya More

बदलापूरकरांना आता महागाईचा सामना करावा लागणार आहे. बदलापुरात पाव महागणार आहे. बदलापूर बेकरी असोसिएशनचा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. २४ डिसेंबरपासून नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात २३ डिसेंबरला बेकरीचालकांनी बंद पुकारला आहे.

सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेला पाव येत्या २४ डिसेंबरपासून बदलापूरमध्ये महागणार आहे. पावाच्या लादीमागे ३ रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय कुळगांव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोशिएशनतर्फे घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत खाद्य तेलापासून किराणामालापर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यात आता पावही महागणार आहेत.

बदलापुरात येत्या २४ डिसेंबरपासून ही नवीन भाववाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे २४ तारखेपासून एका लादीसाठी २३ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा दर २० रुपये इतका होता. बदलापुरात २० बेकरी आहेत. या ठिकाणी दररोज २० हजार पावाच्या लाद्या तयार केल्या जातात. तेल, तूप, साखर आणि मैद्याचे दर वाढल्यामुळे पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी बदलापूरातील सर्व बेकरी बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT