Badlpur Nagarpanchayat And Nagrparishd Election Result Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापूरचा आश्चर्याचा धक्का देणारा निकाल; शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त; नगराध्यक्ष आणि सत्ताही भाजपची

Badlpur Nagarpanchayat And Nagrparishd Election Result : बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी ७,६३४ मतांनी विजयी झाल्या आहेत.

Alisha Khedekar

  • बदलापूर नगरपरिषदेत भाजपचा विजय

  • ७,६३४ मतांनी रुचिता घोरपडे विजयी

  • शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला

  • पराभवानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

मयुरेश कडवं, बदलापूर

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत असून सर्वत्र महायुतीचा दबदबा पाहायला मिळतो आहे. मात्र बदलापुरात भाजपने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. बदलापूर मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी भाजपच्या रुचिता घोरपडे ( Ruchita Ghorpade) ७ हजार ६३४ मतांनी विजयी झाल्या असून वीणा म्हात्रे यांचा पराभव झाला आहे. यामुळे बदलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पाहायला मिळते आहे.

बदलापुरात शिवसेना आणि भाजपात जोरदार चुरस होती. मात्र मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत भाजपने एकहाती विजयश्री खेचून आणली. रुचिता घोरपडे यांना ६४ हजार ६०४ मतं मिळाली तर मीना म्हात्रे यांना ५६ हजार ९७० मतं मिळाली.

नगराध्यक्षपदाच्या विजयासह भाजपने २३ जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना २३ जागांवर विजयी झाली आहे. राष्ट्रवादीने तीन जागा मिळवल्या आहेत. बदलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपच्या विजयाने हा बालेकिल्ला उध्वस्त झाला आहे. पराभवानंतर बदलापूरमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

SCROLL FOR NEXT