Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Case : बदलापूर घटनेप्रकरणी सर्वात मोठी कारवाई, देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश

Badlapur Minor Student Assault case : याआधी एका पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली होती. बदलापूर अत्याचार प्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांवर कारवाई कऱण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Badlapur Minor Student Assault : नराधमानं अगदी कोवळ्या जीवांना ओरबाडलं (Badlapur rape case), अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे बदलापूरकर (Badlapur School Students Molestation Case) रस्त्यावर उतरलाय. शाळकरी मुलींसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज्य सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात गृहमंत्रालयाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. तीन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी एका पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली होती. बदलापूर अत्याचार प्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांवर कारवाई कऱण्यात आली आहे. त्याशिवाया ज्या शाळेत ही घटना घडली तेथील दोन जणांवर कारवाई केली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत कारवाई केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,

"बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. "

पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला -

चिमुकल्या मुलींवर आत्याचार झाल्यामुळे कुटुंबानी त्याप्रकरणी पोलिसात धाव घेतली. १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तक्रार देण्यासाठी दाखल झाले. पण पोलिसांनी एफआयआर नोंदवलाच नाही. १२ तास पोलिस स्टेशनमध्ये थांबल्यानंतरही गुन्हा नोंदवला नाही. पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यांनी हे प्रकऱण दाबण्याचा आरोप करण्यात आला. पण पोलिासांनी गुन्हा दाखल केला नाही. अखेर याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर रात्री एक वाजल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखळ केला. पोलिसांच्या संथ कारभारावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे गृहविभागाकडून पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.

लोकांचा रोष पाहता प्रशासनाने कठोर कारवाई सुरु केली. तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून शाळेलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. त्याशिवाय शाळेचे मुख्याध्यापिकेचे आणि मुलींची देखभाल करत आलेल्या दोन सेविकांचेही निलंबन केले आहे.

ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. त्यासाठी बदलापूरकर रस्त्यावर, पटरीवर उतरले आहेत. मंत्री गिरीश महाजन मध्यस्थीसाठी आले. पण तासभरानंतरही जमावाने ऐकले नाही. त्यांची शिष्टाईही विफळ गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कसब्याची जनता मला पुन्हा निवडून देईल- रवींद्र धंगेकर

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT