badlapur Water Drain Project/representative image Saam tv
मुंबई/पुणे

बदलापूरचा पुराचा धोका होणार कमी, 400 कोटींचा प्लान तयार; कसा असेल संपूर्ण प्रकल्प?

badlapur Water Drain Project : बदलापूरकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. कारण पुराचा धोका कमी करण्यासाठी मोठा प्लान आखण्यात आला आहे.

Mayuresh Kadav

बदलापुरातील नाल्याचं पाणी पाटासारखं वाहणार?

स्टॉर्म वॉटर ड्रेन, नगरपालिकेचा क्रांतिकारी प्रकल्प

भविष्यात नाल्यांवर सोलार प्रकल्प उभारणार

पावसाळ्यात बदलापूर शहराच्या सखल भागाला असलेला पुराचा धोका लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं क्रांतिकारी पाऊल उचललय. बदलापुरात स्टॉर्म वॉटर ड्रेन योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला. या योजनेअंतर्गत शहरातील नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये निर्माण होणारा पुराचा धोका टळणार आहे.

पर्जन्य जलवाहिन्या म्हणजेच पावसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेनं नगरोत्थान योजनेतून 400 कोटींचा डीपीआर तयार केलाय. त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली असून 232 कोटींच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालय.

या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात सुरुवातीला 10 किलोमीटरच्या नाल्यांचं काम केलं जाईल. बेलवलीतील गायत्री गार्डन ते रेल्वे ट्रॅक ,मोहन पाम ते रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे ट्रॅकपासून शनिनगर, हेंद्रेपाडा ते दुबे बाग इथपर्यंत नाल्याचं खोलीकरण करून काँक्रीट बेस तयार केला जाईल. नाल्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट रिटेनिंग वॉल बांधण्यात येतील. ही भिंत हाय फ्लड लेव्हल म्हणजे पूर नियंत्रण रेषेपर्यंत बांधण्यात येईल.

नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण केल्यामुळे पावसाचं पाणी नाल्याबाहेर जाणार नाही. परिणामी नाल्याच्या आसपासच्या नागरी वस्तीत पावसाचं पाणी शिरण्याचा धोका कमी होईल. नाले स्वच्छ होतील. विदेशातल्या धर्तीवर हे नाले बनवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नाल्याच्या एंड पॉइंटवर टर्सरी ट्रीटमेंट करून ते पाणी रिसायकल करण्यासाठीही पालिकेमार्फत डीपीआर तयार केला जात आहे. हे रिसायकल केलेलं पाणी उद्यानांसाठी तसच इतर ठिकाणी वापरलं जाईल. त्यामुळे भविष्यात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नाल्यांवर सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी दिलाय. त्याबाबत नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून त्याचाही डीपीआर तयार केला जाणार आहे. याठिकाणी सोलार प्रकल्प उभारल्यास शहरातील स्ट्रीट लाईट आणि पालिकेच्या इमारतींना लागणारी वीज व्यवस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल. त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात बचत होऊन त्या पैशांचा वापर इतर विकास कामांसाठी करता येईल.

स्टॉर्म वॉटर ड्रेन हा प्रकल्प करणारी बदलापूर नगरपालिका ही राज्यातली पहिली नगरपालिका असून हा एक क्रांतिकारी प्रकल्प मानला जातोय. स्टॉर्म वॉटर ड्रेनमुळे पुराचं पाणी शहरात शिरण्याचा धोका तर कमी होईलच याशिवाय उल्हास नदीचं प्रदूषण रोखण्यात मोठं यश मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच बदलापूरकरांची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उस्मान तारिक की खैर नही! भारतीय फलंदाज करणार जोरदार धुलाई; सूर्यकुमार आणि रिंकू सिंगचा मास्टरप्लॅन तयार |Video

Maharashtra Live News Update : भारत–पाक संघ स्टेडियम परिसरात दाखल; सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

Yoga For Hair Fall: दररोज घरीच 'हे' 5 योगा करा, केसगळती कायमची होईल दूर

Mumbai local crowd : रेल्वे प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार? खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती

Pune: जमिनीच्या वादातून कुटुंबात तुंबळ हाणामारी, महिलांनाही सोडलं नाही; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT