Badlapur Flood Alert Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Flood Alert: बदलापूर शहराला पुराचा धोका, उल्हास नदीचं पाणी शहरात घुसलं; एनडीआरएफची टीम दाखल

Maharashtra Rain Alert: बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. उल्हास नदीच्या या पुराचं पाणी बदलापूर शहरात घुसलं असून अनेक सखल परिसर जलमय झाले आहे.

अजय दुधाने

पुणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्याही वर वाहत आहे. उल्हास नदीच्या या पुराचं पाणी बदलापूर शहरात घुसलं असून अनेक सखल परिसर जलमय झाले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहरात एनडीआरएफ सुद्धा तैनात करण्यात आली आहे. उल्हास नदीचं हे अक्राळ-विक्राळ रूप अनेक वर्षांनी बदलापूरकरांना पाहायला मिळत असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास बदलापूर शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे.

दरम्यान, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येऊन बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामटोली गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कर्जतकडे जाणारा हा राज्य महामार्ग बंद केला आहे.

काही वर्षांपूर्वी याच चामटोली गावाजवळ उल्हास नदीचं पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. आता पुन्हा एकदा चामटोली गावात पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे त्या भयावह पुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT