Badlapur Husband Wife Clash News Saam TV
मुंबई/पुणे

Badlapur Crime News: चारित्र्याच्या संशयातून बायकोला मारहाण; मृत्यू झाल्याचं समजून नवऱ्याने दिला जीव

Badlapur Crime: मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून पती घाबरला. त्याने स्वत: गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

साम टिव्ही ब्युरो

Badlapur Husband Wife Clash News: नवरा-बायकोचा वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. संसाराचा गाडा हाकताना नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असतात. अनेकदा वाद लगेचच मिटतात, तर काही वेळा ते विकोपाला देखील जातात. यातून पुढे खूनासारखे भयंकर गुन्हे घडतात. असाच एक प्रकार बदलापूरमधून समोर आला आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर (Crime News) संशय घेऊन पतीने तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत पत्नी बेशुद्ध होऊन गंभीर जखमी झाली. मात्र, मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून पती घाबरला. त्याने स्वत: गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, ही खबळबळजनक घटना बदलापूर (Badlapur News) पूर्व शिरगाव परिसरातील यादव नगरमध्ये घडली. सुनील आहिर असं पत्नीला मारहाण करून आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. तर सुनील याच्या पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) मृत सुनील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक सुनील हा बदलापूर शहरातील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता. त्याच पक्षातील एका पदाधिकाऱ्यासोबत आपल्या बायकोचे अनैतिक संबंध आहे, असा संशय सुनीलच्या मनात होता.

सुनील हा पत्नीवर नेहमीच संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. मंगळवारी पुन्हा सुनील आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. क्षणात वाद इतका विकोपाला गेला, की सुनीलने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

डोक्याला जबर मार लागल्याने त्याची पत्नी बेशुद्ध होऊन पडली. दरम्यान, उठवून सुद्धा कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने आपल्याकडून पत्नीची हत्या झाली, असा समज सुनीलच्या मनात निर्माण झाला. यामुळे घाबरून त्याने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT