Badlapur Crime News in Marathi  Saam TV
मुंबई/पुणे

बदलापुरातील तरुणाच्या हत्येचा उलगडा; आंध्र प्रदेशात पळून गेलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून केली होती हत्या

अजय दुधाणे

बदलापूर - एका तरुणाची डोक्‍यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी बदलापूर (Badlapur) जवळच्या जुवेली गावात समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Police) अवघ्या ७२ तासात ही हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूरच्या जुवेली गावाजवळील पोद्दार एव्हरग्रीन कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या प्रसाद जिंजूरके या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. (Badlapur Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

सोमवारी दुपारच्या सुमारास जुवेली गावाजवळील मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. या घटनेच्या तपासादरम्यान प्रसाद हा आदल्या दिवशी रात्री समसुल हक गुलाम करीम याच्यासोबत दारू प्यायला गेल्याचं काही जणांनी पोलिसांना सांगितलं.

त्यानुसार पोलिसांनी समसुल हक याचा शोध घेतला असता तो आदल्या दिवशीच कुटुंबासह आंध्रप्रदेशला रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलिसांच्या पथकाने आंध्रप्रदेशात जाऊन समसुल हक याचा शोध घेतला असता तो कुटुंबाला आंध्रप्रदेशात सोडून पुन्हा मुंबईला गेल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांनी घाईघाईने मुंबई गाठत समसुल हक हा कल्याणला पोहोचायच्या आधीच कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचला आणि त्याला बेड्या ठोकल्या.

त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, दारू प्यायल्यानंतर झालेल्या किरकोळ भांडणातून आपण प्रसादची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी समसुल हक याला अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT