CCTV captures shocking moment a car driver runs over a sleeping stray dog in Ambernath’s MHADA Colony. saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime: संतापजनक! कार चालकाने श्वानाला चिरडलं, घटना सीसीटीव्हीत कैद

Man Car Runs Over Stray Dog Video: अंबरनाथमधील म्हाडा कॉलनीमध्ये एका कार चालकाने श्वानाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडलीय. हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • एका व्यक्तीने रस्त्यावर झोपलेल्या श्वानावर कार चढवली.

  • श्वानाचा जागीच मृत्यू झाला.

  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथमध्ये एका कार चालकाने रस्त्यावर झोपलेल्या श्वानाला चिरडल्याची घटना घडली आहे. म्हाडा कॉलनीत घडलेली ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या म्हाडा कॉलनी परिसरात मीरा रॉयल पार्क नावाची सोसायटी आहे.

या सोसायटीत बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक कारचालक येत असताना त्याने रस्त्यावर झोपलेल्या श्वानाच्या अंगावरून गाडी नेली. या घटनेत श्वानाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. ही घटना पाहून सुरक्षारक्षकांनी तिथे धाव घेतली असता कारचालक दिग्विजय बेरूलकर याने सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत मृत श्वानाला गाडीत टाकलं आणि तिथून निघून गेला. याबाबत श्वानप्रेमी मनोज फलके यांना माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी धाव घेत माहिती घेतली.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानुसार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक दिग्विजय बेरुलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT