Mumbai High Court Google
मुंबई/पुणे

Badlapur Case Update: बदलापूर पोलिसांचं कुठं चुकलं? हायकोर्टाने व्यक्त केली तीव्र नाराजी

Mumbai High Court On Badlapur Case: बदलापूर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

Priya More

सचिन गाड, मुंबई

'आरोपपत्र घाईघाईने दाखल करण्याची चूक करू नका.', असे मुंबई हायकोर्टाने एसआयटीला बजावलं. बदलापूर शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने बदलापूर पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटना गंभीरतेने न घेत, निष्काळजी कारभार करणाऱ्या बदलापूर पोलिसांच्या कारभारावर मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. केस डायरीतून बदलापूर पोलिसांचा निष्काळजीपणा हायकोर्टात उघड झाला. फक्त याच नाही तर पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गंभीरतेनं पाहण्याची गरज असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने यावेळी केले. तसंच, आरोपपत्र घाईघाईने दाखल करण्याची चूक करू नका असे हायकोर्टाने एसआयटीला खडसावून सांगितले.

तसंच याप्रकरणाची सखोल चौकशी करा असे हायकोर्टाने आदेश एसआयटीला दिले. या तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता हायकोर्टाने व्यक्त केली. बदलापूर प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत. विद्यालयचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे अद्यापही फरार आहेत. हे आरोपी न सापडल्यामुळे हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. फरार आरोपी अद्याप न सापडणे हे खेदाची बाब असल्याचे हायकोर्टाने सांगितले. तपासयंत्रणेच्या कारभारावर देखील हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT