Badalapur Case Accused Akshay Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Case: तो लैंगिक विकृत आहे, अक्षय शिंदेच्या पहिल्या बायकोचा गंभीर आरोप

Badalapur Case Accused Akshay Shinde: बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. याप्रकरणाचा तपास करताना एसआयटीला आरोपीच्या पहिल्या पत्नीचा शोध लावण्यात यश आले आहे.

Priya More

बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपेडट समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर त्याच्या पहिल्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे. अक्षय शिंदे हा लैंगिक विकृत असल्याची माहिती तिने पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेविरोधात दुसऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे.

बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. याप्रकरणाचा तपास करताना एसआयटीला आरोपीच्या पहिल्या पत्नीचा शोध लावण्यात यश आले आहे. अक्षय शिंदेची पहिली पत्नी पालघरमध्ये राहते. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. तेव्हा तिने पोलिसांना अक्षय लैंगिक विकृत असल्याची माहिती दिली.

अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, आरोपीच्या हिंसक लैंगिक वर्तनामुळेच तिने लग्नानंतर पाच दिवसांनी त्याला सोडले आणि परत सासरी गेली नाही. अक्षय क्रूर व्यक्ती आहे. आरोपीच्या वागणुकीवरून तो अशाप्रकारचे गुन्हे करू शकतो असा विश्वास तिने व्यक्त केला. अक्षयविरोधात कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी तयार असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. आरोपी अक्षय शिंदेने तीन लग्न केले होते. त्याच्या दोन पत्नी लग्नानंतर १० दिवसांतच त्याला सोडून गेल्या होत्या. त्याच्यासोबत राहणारी तिसरी पत्नी गरोदर आहे. पण आरोपीने दावा केला की, त्याच्या पहिल्या दोन पत्नी चांगल्या स्वभावाच्या नव्हत्या.

अक्षय शिंदेला याप्रकरणात कठोर शिक्षा होण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीची साक्ष हा महत्वाचा पूरावा म्हणून काम करेल, असे पोलिसांनी सांगितले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. एसआयटीची टीमने अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्यामसोर सुनावणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT