Badlapur Case update  Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : पहिल्या दिवशी अटक, दुसऱ्या दिवशी ट्विस्टवर ट्विस्ट, एकाच वेळी जामीन आणि लगेच अटक

Badlapur Case Update : बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना जामीन मंजूर झाला. त्यानतंर तातडीने पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज गुरुवारी जामीन मिळाला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली. जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा कोर्टातूनच अटक केली. त्यामुळे आता या दोघांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणात ,संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना सहआरोपी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दीड महिन्यांनी या फरार सहआरोपींना कर्जतमधून अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोघांना कोर्टात हजर केलं होतं. अटक केलेल्या दोघांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने त्यांचा जामीन देखील मंजूर केला. मात्र, पोलिसांनी अपराध क्रमांक ३९१ नुसार त्यांना कोर्टातूनच अटक केली.

बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुली होत्या. या प्रकरणी दोन एफआयर दाखल करण्यात आले होते. एका गुन्ह्यात तत्काळ जामीन मिळाला. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार कोर्टाने परवानगी दिली. त्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी कोर्टातूनच अटक केली. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळाले. आज दिवसभरात त्यांना एकाच वेळी जामीन मिळाला त्यानंतर पोलिसांनी लगेच अटक केली.

जामीन मिळताच पुन्हा अटक कशी झाली?

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन पीडित आहेत. या सहआरोपींना दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात शाळेच्या संचालकांना अटक झाली. त्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन दिली. त्यानंतर दुसऱ्या पीडितेच्या गुन्ह्यात दोन्ही संचालकांना त्वरित अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT