Bad Road Conditions In Mumbai, Thane, KDMC in Maharashtra SAAM TV
मुंबई/पुणे

Bad Road Conditions : मुंबईसह राज्यभरात खड्ड्यांचे साम्राज्य, खड्डेमुक्त रस्त्यांचे काय झाले?; विरोधकांचा खडा सवाल

Mumbai Roads : मुंबईसह महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झाले?, असा सवाल विरोधक करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bad condition of roads In Mumbai And Maharashtra : महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; पण अजूनपर्यंत सर्व्हे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे अस्मानी संकट आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणा मागून घोषणा करत आहे. सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे. तर अंमलबजावणी मात्र शून्य आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झाले?, असा सवालही त्यांनी केला. (Tajya Marathi Batmya)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकार वर्षभरापासून केवळ पोकळ घोषणा करत आहे. जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. या सरकारवर शेतकरी व जनतेचा भरवसा राहिलेला नाही. राज्यात सरकार आहे की नाही असे चित्र आहे. प्रशासनात अनागोंदी चालली असून जनतेला लुटले जात आहे, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला.

मुंबईसह राज्यात सगळीकडील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून, लोकांचे नाहक बळी जात आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल उपस्थित केला. राज्याची 'समृद्धी' करायला निघालेल्या सरकारने समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनवला आहे. विधानसभेत सरकारला प्रश्न विचारले तर मंत्री स्पष्ट उत्तरे देत नाहीत, तपासू, बघू, पाहू अशी उत्तरे दिली जातात, असेही पटोले म्हणाले.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंदर्भात गाईडलाईन्स आहेत. रस्त्यावर खड्डे असतील तर टोल घेतला जात नाही, पण नॅशनल हायवेवर खड्डे पडलेले असतानाही टोल वसुली केली जात आहे. टोलमाफियांचे राज्य असून सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. टोलमाफिया सरकारचे जावई आहेत का? असा सवालही नाना पटोले यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT