bacchu kadu  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics : मुंबई आणि गावातही मतदान कार्ड, सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

bacchu kadu on Maharashtra Politics : दोन मतदान कार्ड असणाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील मराठी माणूस कोणत्या राजकीय पक्षाला सत्ता देणार, याकडे साऱ्यांचं विशेष लक्ष असणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई आणि गावातही मतदान कार्ड असणाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

माजी मंत्री बच्चू कडू राज्यातील घडामोडींविषयी भाष्य करताना मुंबई महापालिकेबाबत मोठा दावा केला आहे. बच्चू कडू यांनी म्हटलं की, 'मुंबईत मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहेत. कारण कोकणात आणि मुंबई मराठी माणसांचं मतदान आहे. मात्र, ते लगेच एक पत्र काढणार असून नवीन कायदा आणणार आहे. आता दोन्ही ठिकाणी मतदान करेल, त्याला पंधरा हजार रुपये दंड असेल, अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला मिळाले आहेत'. बच्चू कडू यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलतान बच्चू कडू म्हणाले, 'ते पहिलेच एकत्र आहेत. कोण म्हणते वेगळे आहेत. किती पुरावे देतो की, ते एकत्र आहेत. जशी चाणक्यनीती आहे, तशी पवार नीती देखील आहे'. एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले, 'अजितदादांचं नाव घेत हे सगळे फुटले. याच अजितदादांमुळे मोठी पंचायत झाली आहे. यावर्षी पुनर्रचना होणार आहे. त्यांचा व्यवस्थित गेम करायचा होता. प्रत्येक राज्यात भाजपने व्यवस्थित स्थान घेऊन आहे. पुनर्रचनेमध्ये राज्य आणि देश एकत्रित असला तर पुनर्रचना म्हणावे तशी करता येते हा त्यामागचा डाव आहे'.

'सत्तेसाठी सगळे नियम बाजूला ठेवून भाजपचं राजकारण. सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे औरंगजेब जसा चाल करून यायचा, तेवढे जरी नसलं तरी राजकारणात काही करा पण सत्ता हाती घ्यावी, अशा मानसिकतेत सध्या भाजप आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT