बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख  Saam Tv
मुंबई/पुणे

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : थोर इतिहासकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्री पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. श्री देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहिले.

हे देखील पहा-

छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन, संदर्भ हे आपणासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ' जाणता राजा ' या महानाट्याच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाचा वाटा दिला असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर मागील आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपाचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती या ठिकाणी असलेल्या निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनाकरिता गर्दी होत आहे. पर्वती पायथा निवासस्थानी ८ ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: क्रॉक्रोच पार्टी विरोधात झेन नेक्स्ट तरुण उतरणार रस्त्यावर

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

SCROLL FOR NEXT