मुंबई/पुणे

Baba Siddiqui: सलमानशी मैत्री सिद्दिकींच्या जीवावर? अनुज थापनच्या बदल्यासाठी सिद्दिकींची हत्या?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

सलमान खानशी मैत्री सिद्दिकींच्या जीवावर बेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारलीय त्यामध्ये सलमानच्या नावाचा उल्लेख केलाय...त्यामुळे सलमान खान आणि सिद्दीकींच्या मैत्रीचं कनेक्शन काय आहे पाहुयात.

सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आणि एकच खळबळ उडालीय. सलमानला नेहमी धमकी देणाऱ्या बिश्नोई गँगने सलमानच्या मित्राचीच म्हणजेच बाबा सिद्दिकींची हत्या केलीय. सिद्दिकी आणि सलमानची मैत्री ही जगजाहीर होती आणि हीच मैत्री सिद्दिकींच्या जीवावर बेतल्याची सध्या चर्चा सुरूये. सलमान आणि सिद्दिकींचं कनेक्शन कसं होतं पाहुयात

सलमान-सिद्दिकींचं कनेक्शन काय?

बाबा सिद्दिकींची सलमान आणि शाहरूखशी चांगली मैत्री होती

इफ्तार पार्टीत बॉलिवूडसह राजकीय नेते हजेरी लावायचे

सलमान-शाखरुख खानच्या वादात सिद्दिकींनीच मध्यस्थी केलेली

सलमानसह बॉलिवूड कलाकारांसोबत नेहमीच उठबस

हीच मैत्री बिश्नोई गँगला खटकली आणि अनुज थापनचा बदला घेण्यासाठीच बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची थेट कबुलीच बिश्नोई गँगने दिलीय. इतकंच नव्हे तर हत्येची जबाबदारी स्विकारताना सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना मारलात तर अजून प्रतिक्रिया देऊ अशी धमकी दिलीय. हत्येची जबाबदारी स्वीकारताना बिश्नोई गँगने काय म्हटलंय पाहुयात.

बिश्नोई गँगने स्वीकारली हत्येची जबाबदारी

सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं, पण तू आमच्या भावाचं नुकसान केलं.

सिद्दिकींच्या चांगुलपणाचे उदाहरण देत आहेत तो कधीकाळी दाऊदसोबत मकोका अॅक्टखाली होता.

सिद्दिकींच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन, दाऊद आणि बॉलीवूडमधील राजकीय मालमत्ता व्यवहार.

दाऊद आणि सलमानला ज्यांनी मदत केली त्यांनी आपले हिशोब लक्षात ठेवावे.

आमच्या भावांपैकी कोणी मारले गेले तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ.

बिश्नोई गँगने यावेळी दाऊद, सलमान, बॉलिवूड आणि अनुप थापन याचं नाव घेतलंय...यात अनुप थापन म्हणजे सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणारा आरोपी. मात्र, जेलमध्ये याच थापनचा मृत्यू झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठीच सिद्दिकींच्या हत्येचा कट रचल्याचं बोललं जातंय...अनुप थापनच्या मृत्यूचा बदला कसा घेतला पाहुयात.

अनुज थापनच्या बदल्यासाठी सिद्दिकींची हत्या?

अनुज थापन लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर

14 एप्रिलला सलमान खानच्या घरावर गोळीबारातील आरोपी

अनुज थापनने गोळीबार करणाऱ्या दोघांना बंदूक पुरवली होती

1 मे रोजी अनुजचा मुंबई पोलिसांच्या कोठडीत मृत्यू

अनुजची तुरुंगात हत्या केल्याचा बिश्नोई गँगचा आरोप

सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर आहे...अनेकवेळा सलमानला धमक्याही आल्या...मात्र, आता बिश्नोई गँगने सलमानच्या जवळच्यांना टार्गेट केलंय. सिद्दिकींची हत्या ही सलमान खानला घाबरवण्यासाठीच असल्याचंही बोललं जातंय.त्यामुळे सलमानला या टोळीपासून धोका आहेच...मात्र, त्याच्या जवळचेही टार्गेटवर असल्याने धोका आणखीच वाढलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

Ajit Pawar: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य! काल ६०० कार्यकर्त्यांनी साथ सोडली, आज खंद्या समर्थाकाने दंड थोपाटले, अजित पवारांना इशारा!

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

SCROLL FOR NEXT