Baba Siddique News Saam tv
मुंबई/पुणे

Baba Siddique News : सलमानशी मैत्री, बिश्नोईची धास्ती; धमकी, रेकीनंतर मित्राला संपवलं, पाहा स्पेशल रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : दिग्गज नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या निकटवर्तीयांचं टेंशन वाढलंय...सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारताना लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानचा उल्लेख करत सलमानच्या निकटवर्तीयांना थेट धमकीच दिलीय..

दाऊद आणि सलमान खानची मदत करणाऱ्यांचा हिशोब करण्याचा इशाराच बिश्नोई गँगने दिलाय...तर बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.. मात्र सलमान खानला बिश्नोई गँगकडून पहिल्यांदाच धमकी मिळाली नाही तर याआधीही रेकी, धमकी आणि फायरिंगच्या घटना घडल्यात. मात्र सलमान बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर का आहे? पाहूयात.

गेल्या वर्षभरात सातत्याने लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला हत्येची धमकी दिली जातेय..तर 2018 मध्ये संपत नेहरा सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी आला होता. तो अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याने तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं समोर आलंय..मात्र धमक्या आणि रेकीचं हे पहिलंच प्रकरण नाही तर याआधीही बिश्नोई गँगकडून धमक्यांचं सत्र सुरूच होतं.

मे 2023 सलमानला ई-मेलवर हत्येची धमकी

धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ

नोव्हेंबर 2023 मध्ये सलमानला जीवे मारण्य़ाची धमकी

धमकीनंतर पोलिसांकडून आरोपींसाठी लुकआऊट नोटीस जारी

एप्रिल 2024 मध्ये लॉरेन्स गँगकडून सलमानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार

सप्टेंबर 2024 मध्ये सलमानचे वडील सलीम खान यांना हत्येची धमकी

सलग 6 वर्षांपासून बिश्नोई आणि कॅनडाचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर गोल्डी बराडने सलमान खान आणि त्याच्या निकटवर्तीयांवर दहशत कायम ठेवलीय.. मात्र सलमानचे निकटवर्तीय असल्याने सिद्दिकींची हत्या झालीय की आणखी काही कारण यामध्ये आहे? हे तपासातून पुढे येईलच...मात्र सलमान खानचे मित्र बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे ब़ॉलिवूडसह राजकीय विश्व हादरवून सोडलंय..त्यामुळे पोलिसांनी तातडीने कठोर पावलं उचलून अशा गँग मुळापासून उखडून टाकायला हव्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Toll-free entry in Mumbai : मुंबईकरांना टोलमाफीचं गिफ्ट; कोणत्या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना 'टोल फ्री'? VIDEO

Maharastra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; संजीवराजे,दीपक चव्हाणांच्या हाती तुतारी, आता फलटणमध्ये गणित काय? VIDEO

Maratha Reservation: जरांगेंचा इशारा, सरकारचं दुर्लक्ष; विधानसभेलाही आरक्षणाचा मुद्दा पेटणार

SCROLL FOR NEXT