Baba Siddique Saam Tv
मुंबई/पुणे

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, हरियाणातून आणखी एकाला अटक

Mumbai Police: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अमित हिसमसिंग कुमार नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Priya More

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने हरियाणामधून २९ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ वर पोहचली आहे. या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अमित हिसमसिंग कुमार नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अमित कुमार हा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. अमितचा या गुन्ह्यामध्ये सहभाग निश्चित झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अमित कुमारची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. लवकरच त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे.

२० ऑक्टोबरला या प्रकरणात एका भंगार विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली होती हा आरोपी मूळचा राजस्थानच्या उदयपूर येथील रहिवासी आहे. भगवंत सिंग असं या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईमध्ये राहतो. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी भगवंत सिंगने शस्त्र पुरवले असल्याचा आरोप आहे. सध्या भगवंत सिंग हा पोलिस कोठडीत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली होती. या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. पोलिस सध्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. याप्रकरणी पुण्यातील शुभम लोणकर नावाच्या तरुणाला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT