MPF Ambernath Recruitment Saam Tv
मुंबई/पुणे

MPF Recruitment : अंबरनाथमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भरघोस पगार मिळणार, अर्ज कसा करावा?

AVNL MPF Ambernath Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. मशील टूल प्रोटोटाइप फॅक्टरीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

शिक्षण पूर्ण झाले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अंबरनाथ येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे एकूण १३३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.ज्युनियर टेक्निशियन, ज्युनियर मॅनेजर आणि डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये विविध टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, इलेक्ट्रिक फिटर, मिलराइट, एक्सामिनर, एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग, टूल डिझाइन अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग पदवी, मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा पास केलेले उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

ज्युनिअर टेक्निशियन पदासाठी २१,००० ते ३४,२२७ रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर मॅनेजर पदासाठी ३०,००० ते ४७,६१० रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी २३,००० ते ३७,२०१ रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. चीफ जनरल मॅनेजर, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, युनिट ऑफ एव्हीएनएल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनटरप्राइज अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथे अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याआधी भरतीची जाहिरात वाचावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT