ambernath saam tv
मुंबई/पुणे

Positive News : रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; साेन्याचे दागिने केले परत, युवती खूष

ज्या पर्समध्ये नऊ तोळ्यांचं गंठण ठेवलं होतं, ती पर्स रिक्षामध्येच विसरली हाेती.

अजय दुधाणे

Positive News : अंबरनाथमध्ये रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत रिक्षात विसरलेलं नऊ तोळ्यांचं गंठण परत केल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या रिक्षा चालकाचा शोध घेत हे गंठण परत मिळवून दिलं. (Ambernath Latest Marathi News)

मुंबईत राहणाऱ्या आस्था निकम या युवतीच्या घराचं काम सुरू असल्यामुळे तिने तिच्या आईचं नऊ तोळ्यांचं गंठण अंबरनाथला राहणाऱ्या तिच्या मामाच्या घरी ठेवलं होतं. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी हे गंठण लागणार असल्याने आस्था ही मुंबईहून अंबरनाथला (ambernath) आली आणि मामाकडून गंठण घेऊन घाटकोपरला परत जाण्यासाठी निघाली. (Maharashtra News)

यावेळी अंबरनाथ रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षाने येऊन ती रेल्वे स्थानकात गेली. मात्र ज्या पर्समध्ये तिने आईचं नऊ तोळ्यांचं गंठण ठेवलं होतं, ती पर्स मात्र ती रिक्षामध्येच विसरली. ही बाब लक्षात येताच तिने मामाच्या घरी जात हा प्रकार सांगितला. त्यानंतर मामाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धाव घेत पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली.

यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या रिक्षाचा शोध घेतला असता ही रिक्षा शिवगंगा नगरमध्ये राहणारे रिक्षाचालक रमेश लदगे यांची असल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी लदगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या रिक्षात एक बॅग महिला प्रवासी विसरून गेल्याचं सांगितलं.

मात्र ती बॅग लदगे यांनी उघडून देखील पाहिली नव्हती. पोलिसांनी संपर्क साधताच लदगे यांनी प्रामाणिकपणे ही बॅग पोलिसांच्या सुपूर्द केली. त्यानंतर आस्था निकम आणि त्यांच्या परिवाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन रिक्षाचालक रमेश लदगे यांचा सत्कार केला. यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी रिक्षात राहिलेलं नऊ तोळ्यांचं गंठण आस्था निकम यांना सुपूर्द केलं.

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी रिक्षाचालक तसेच रिक्षाचालकाला शोधून काढणारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचं अभिनंदन केलं आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT