Audi India Saam Tv
मुंबई/पुणे

Audi India: ऑडी इंडियाच्या कार महागणार, 1 एप्रिलपासून किंमतीत 3 टक्के वाढ

जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडी (Audi) आपल्या कारचे दर वाढवणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत-

मुंबई: जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडी (Audi) आपल्या कारचे दर वाढवणार आहे. ऑडी इंडिया 1 एप्रिलपासून आपल्या एसयूव्ही कारच्या किंमतीत 3 टक्क्यांची वाढ करणार आहे. कंपनीने आपल्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Audi Indias cars will become more expensive due to increase in input cost).

ऑडी इंडियाचे (Audi India) प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, "ऑडी इंडियामध्ये आम्ही शाश्वत व्यवसाय मॉडेल चालवण्यासाठी वचनबद्ध आहोत. वाढत्या खर्चामुळे आणि परकीय चलन दरातील बदलांमुळे आम्हाला आमची मॉडेल श्रेणीमध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची गरज आहे."

Audi च्या कोणत्या गाड्यांचा समावेश?

ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए8 एल, ऑडी क्यू2, ऑडी क्यू5 आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 7 स्पोर्टबॅक तसेच ऑडी आरएस क्यू8 या गाड्यांचा समावेश आहे.

ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) पोर्टफोलियोमध्ये ऑडी ई-ट्रॉन 60, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ऑडी ई-ट्रॉन जीटीचा समावेश आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा थरारक अवतार; O Romeo चं फर्स्ट लूक पोस्टर पाहून अंगावर येईल काटा, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Poha Chakali Recipe : वाटीभर पोह्यांची करा कुरकुरीत चकली, १५ मिनिटांत चटपटीत स्नॅक्स तयार

Ladki Bahin Yojana: मकरसंक्रांतीला लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार; पण 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT