Uddhav Thackeray/SambhajiRaje Saam TV
मुंबई/पुणे

'छत्रपतींशी खोटं बोलू शकतात ते अमित शहांशीही बोलू शकतात'

"अमित शहा यांनी बंद दरवाजाआड वचन दिलं होतं”, हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगलं"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटं बोलू शकतात, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशीही बोलू शकतात. 'त्यामुळे बंद दरवाजाआड वचन दिलं होतं' हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगलं आहे अशी बोचरी टीका भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

आज संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपणाला दिलेला शब्द पाळला नसल्याचं वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हे देखील पाहा -

ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटं बोलू शकतात, असलं मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटं बोलू शकतात. हे आज पूर्णपणे सिद्ध झालं आहे असं भातखळकर म्हणाले.

तसेच कुठल्याही मुख्यमंत्रीपदाचे वचन हे त्यांना दिले गेले नव्हते, परंतु केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, हेच आजच्या छत्रपती संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झालेले आहे असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT