Ahmednagar: "शासकीय रुग्णालयातील दुर्घटना ठाकरे सरकारच्या निष्क्रियेतमुळे घडलेलं हत्याकांड" सुशांत सावंत
मुंबई/पुणे

Ahmednagar: "शासकीय रुग्णालयातील दुर्घटना ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेलं हत्याकांड"

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा - अतुल भातखळकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - अहमदनगर शासकीय रुग्णालयातील दुर्घटना नसून महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

हे देखील पहा -

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत झालेल्या ११ रुग्णांच्या मृत्यूस केवळ महाभकास आघाडी सरकार जबाबदार असून, ही दुर्घटना नसून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड असल्याची टीका करतानाच, भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आगीची घटनेच्या वेळी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर करून आज १० महिने उलटून गेले असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकारने त्यातील एकाही सूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यानेच अहमदनगर येथील हत्याकांड घडले आहे, त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

९ जानेवारी रोजी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने जानेवारीमध्येच सरकारला अहवाल सादर करून राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ सुधारणा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या १५ सूचना केल्या होत्या. परंतु त्यातील एकाही सूचनेची ठाकरे सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. केवळ वसुली व टक्केवारी मध्ये मग्न असलेल्या सरकारने एकाही शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट केले नाही, कोणत्याही शासकीय रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी व सुधारण्यासाठी निधी दिला नाही.  

मागील वर्षभराच्या काळात ७ रुग्णालयांमध्ये आग लागून ७८ रुग्णांचा बळी गेला, घटनेनंतर ‘आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे’, ‘चौकशी करून दोषींवर कारवाई करू’ अशी मोघम व वेळकाढू वक्तव्ये करायची, परंतु प्रत्यक्ष कृती करताना हाताला लकवा मारल्याप्रमाणे थंड राहायचे असा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने चालविला आहे. मुख्यमंत्री महोदय, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेतल्यावर आपल्या सरकारला व मंत्र्यांना जाग येणार आहे? असा सवाल सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT