पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थत्रेक्ष व्हावं - पीएम नरेंद्र मोदी

पंढरपूरमध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले, त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.
पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थत्रेक्ष व्हावं - पीएम नरेंद्र मोदीं
पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थत्रेक्ष व्हावं - पीएम नरेंद्र मोदींSaam Tv
Published On

पंढरपूर: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी केंद्री आणि रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, संतांच्या आशीर्वादाने आपण हा मार्ग लवकरच पूर्ण करू. राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 334 कोटी मंजूर केले आहेत. पालखी मार्गामुळे वारकऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. दोनशे तेवीस किलोमीटरच्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूने वारकऱ्यांना पायी चालताना त्रास होऊ नये म्हणून गवत लावण्यात येणार आहे. वाखरी पंढरपूर या मार्गासाठी 74 कोटी रुपये देण्यात येतील अशी नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. (Pandharpur should be the cleanest pilgrimage site in the country - PM Narendra Modi)

हे देखील पहा -

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, वारकऱ्यांनी जीवनाचा मार्ग दाखवला, संस्कार दिला, मूल्याधिष्ठित जीवनपद्धती शिकवली. तुकाराम महाराजांचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे विचार कधी विसरणार नाही, सगळी आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्य सरकार या रस्त्यासाठी पुर्णपणे सहकार्य करेल, केंद्र सरकार सोबत राज्य सरकार कायम असेल. वारकऱ्यांच्या महासागराला विठुनामाचा नाद असतो. भक्ती मार्गावरुन देशाने वाटचाल केली आहे यापुढेही अशीच वाटचाल सुरू राहावी. परकीय आक्रमणे झेलून वारकरी परंपरा सुरू ठेवली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुमिपूजन केल्यानंतर ते म्हणाले की, मला फार आनंद झाला आहे, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भुमिपूजन होत आहे. पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका आहे. पवित्र मार्गाकडे नेणारे महामार्ग ठरतील. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात काम होणार आहे. 325 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात येणार आहे, यासाठी १२०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी हा विशेष मार्ग बनविण्यात येणार आहेत.

विठ्ठल हे सर्वांचे एकच गोत्र - मोदी

महाराष्ट्राला आणि देशाला जोडण्यासाठी पालखी मार्ग उपयोगी ठरणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल चरणी आणि संतांच्या चरणी नमस्कार करतो. देशावर अनेक संकटे आली विठ्ठल कृपेने आम्ही ते परतवून लावली. आषाढी यात्रेत इथे विहंगम दृश्य कधीही विसरण्यासारखे नाही. सतत पंढरीत राम कृष्ण हरीचा नामजप सुरू असतो. पुढे मोदी म्हणाले की, विठ्ठल हे सर्वांचे एकच गोत्र आहे, पंढरपूरची अनुभूती सर्वश्रेष्ठ आहे, पंढरपूरची माझे विशेष नाते आहे. पंढरपूर आणि काशीचे माझे विशेष जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पंढरपूरची भूमी ही देशाला दिशा देणारी‌ आहे. सामाजिक समता संदेश देणारी वारी आहे. विठू माऊलीच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटते.

पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थत्रेक्ष व्हावं - पीएम नरेंद्र मोदीं
वारकरी संप्रदायात आनंद; पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

पंढपूरकरांकडून घेतली तीन वचनं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढपूरकरांकडून तीन वचनं घेतली आहे. ती म्हणजे पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करा आणि पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थत्रेक्ष मला बघायचं आहे ही तीन वचनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढपूरकरांकडून घेतली आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com