Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut on Eknath Shinde: महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न गुजरातच्या भूमीवर; संजय राऊतांचे गंभीर आरोप

मध्यप्रदेश, राज्यस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. अस्थिरत करता येणार नाही. सेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं शक्य नाही.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गुजरातमध्ये आमच्या आमदारांना अडकवून ठेवलं आहे. गुजरातमध्ये कोणाचं सरकार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. गुजरातमधील हॉटेलच्या बाहेर ७ स्थरांची सुरक्षा ठेवली असून मुख्य रस्त्यावर येण्याचे रस्ते देखील घेरले आहेत. शिवाय महाराष्ट्राला अस्थिर करण्याची भूमिका गुजरातच्या भूमीवर सुरु असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून ते सध्या गुजरातमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिंदे हे नॉट रिचेबल असल्यामुळे राज्यातील सरकारमधून ते बाहेर पडणार का अशा चर्चा सुरु असून या सर्व पार्श्वभूमीवरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सर्व प्रकरणार भाष्य केलं आहे. (Eknath Shinde News)

ते म्हणाले आमचे काही आमदार मुंबईत नाहीत. सेनेचा काही मतदारांशी संपर्क होत नाही हे सत्य आहे. काही आमदारांशी संपर्क झालाय, काही आमदारांना गैरसमजातून बाहेर गेले आहेत एकनाथ शिंदेंही बाहेर आहेत हे खरं आहे. पण त्यांच्याशी संपर्क झाला आहे. शिवसेनेत फूट होईल असं म्हटलं जातय पण तसं होणार नाही. संशयाच वातावरण तयार केलं गेलं आहे, पण ते दूर होईल आमची वर्षावर बैठक आहे. आम्ही जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये चर्चा होत असते असही राऊत म्हणाले.

तसंच मध्यप्रदेश राज्यस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. अस्थिरत करता येणार नाही. सेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं शक्य नाही.

हे देखील पाहा -

राऊत पुढं म्हणाले, 'मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा करत आहेत, त्यांची पाऊलं कोणत्या दिशेला चालली आहेत, सेनेला कमजोर केलं पाहिजे मग मुंबई मिळवता येईल, हा फार मोठा कट आहे. आईचं दूध विकणारे सेनेत नाहीत, सत्तेसाठी आणि पदांसाठी सेनेला सोडणार नाही, जे सोडून गेले त्यांची स्थिती ठाऊक आहे. ज्यांची नावं घेतली माध्यमांवर घेतली जात आहेत, ते लोक आमच्यासोबत आहेत, वर्षावर आहेत असा खुलासा राऊत यांनी यावेळी केला.

गुजरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमच्या आमदारांची तिकडे व्यवस्था करतायत ,त्या आमदारांना ठाऊक नव्हते कशासाठी बोलावलं गेलं आहे. मला वाटत नाही, एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते , शिंदे आमचे जिवा भावाचे शिवासैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यासोबत आमचा संपर्क होत नाही, तो पर्यंत बोलणार नाही.

मुख्यमंत्री सर्व खात्यांचा आढावा घेत असतात, तरीही त्यातून काही गैरसमज झाले असतील ,तर ते दूर होतील. पवारसाहेब दिल्लीत निघाले आहेत, उद्धवजींनी मला येथे थांबायला सांगितलं आहे. आम्ही सगळे सहकारी संपर्कात असून सर्व सहकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी देखील सरकार स्थापन करण्याचा भाजपने प्रयत्न केला पण ते होणार नाही असंही राऊत यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT