Attempted Theft at Hanuman Temple in Ambernath; The thief fled in fear of CCTV Saam tv
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न; सीसीटीव्हीच्या धाकानं चोर पळाले

Attempted Theft at Hanuman Temple in Ambernath: सकाळी पुजाऱ्यांना मंदिरात अगरबत्तीचा स्टॅन्ड खाली पडलेला आणि अंगारा सांडलेला दिसला.

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथच्या खुंटवली परिसरातील हनुमान मंदिरात (Hanuman Temple) काल (बुधवारी) रात्रीच्या सुमारास एका चोरट्यानं (Theif) दानपेटी (Donation box) फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV) कैद झाला असून याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (Attempted Theft at Hanuman Temple in Ambernath; The thief fled in fear of CCTV)

हे देखील पाहा -

अंबरनाथच्या (Ambarnath) खुंटवली परिसरात गावकीचं जुनं हनुमान मंदिर आहे. या मंदिरात मंगळवारी रात्री उशिरा एक चोरटा घुसला. तोंडाला रुमाल आणि डोक्याला स्कार्फ गुंडाळत त्यानं दानपेटीकडे मोर्चा वळवला आणि हातात मिळेल त्या साधनानं दानपेटी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दानपेटी फोडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरत असतानाच या चोरट्याकडून अगरबत्तीचा स्टॅन्ड कोसळला आणि त्याचं लक्ष मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीकडे गेलं. त्यामुळं एक काठी घेत त्यानं सीसीटिव्हीचं तोंड फिरवलं आणि दानपेटी न फोडताच तिथून पोबारा केला.

सकाळी पुजाऱ्यांना मंदिरात अगरबत्तीचा स्टॅन्ड खाली पडलेला आणि अंगारा सांडलेला दिसल्यानं त्यांनी सीसीटीव्ही चेक केलं असता त्यात रात्री एक चोरटा येऊन चोरीचा प्रयत्न करून गेल्याचं निदर्शनास आलं. या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मंदिराचे ट्रस्टी बाहेर गेले असून ते आल्यानंतर फिर्याद देतील, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

Nilesh Ghaiwal: गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग

Lava Smartphone Shark 2 : कमी किमतीत धमाकेदार फीचर्स! Lava Shark 2 मध्ये काय खास? जाणून घ्या

कामाची बातमी! ११ वर्षांनंतर EPFO नियमांत करणार मोठा बदल; १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT