Pune Crime: पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले सपासप वार; पुण्यातील धक्कादायक प्रकार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले सपासप वार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

देहूगावात एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्याजवळच (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरातील भोसरी येथे गुळवे वस्ती परिसरात २ दिवसांपूर्वी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करत संबंधित युवकाचे डोके ठेचले होते. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच, पिंपरी परिसरातील देहूगावात एका तरुणावर कोयत्याने सपासप वार (attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पार्टी न देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हा धक्कादायक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जखमी युवकाने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चंद्रकांत पाटोळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २८ वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो देहूगाव (Dehugaon) येथील रहिवासी आहे. तर निखिल नंदनराज चव्हाण असे हल्ला झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील चव्हाण हा आपले नातेवाईक सर्जेराव ओव्हाळ उर्फ दावडीकर यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात मित्रांबरोबर डान्स करत होता. यावेळी निखीलच्या भावकीमधील आणि नातेवाईक असणारा आरोपी (Accused) तरुण पाटोळे याठिकाणी आला होता. त्याने फिर्यादीकडे पार्टी मागितली. पण फिर्यादीने पार्टी देण्यास नकार दिला आहे. पार्टी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीवर धारदार कोयत्याने सपासप वार केले आहे. या हल्ल्यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जखमी तरुण निखील चव्हाण याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नसून घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. केवळ पार्टी न दिल्याच्या कारणातून तरुणाने असे कृत्य केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

Healthy Chapati : गव्हाची चपाची पौष्टीक करण्यासाठी खास टिप्स, मुलांच्या टिफीनसाठी खास रेसिपी

SCROLL FOR NEXT