स्पाय कॅमेरे लावून ATM मशीनमध्ये चोरी करणाऱ्या गॅंगला अटक; पाहा Video Saam TV
मुंबई/पुणे

स्पाय कॅमेरे लावून ATM मशीनमध्ये चोरी करणाऱ्या गॅंगला अटक; पाहा Video

लखविरसिंग उर्फ लख्खा बलदेवसिंग, रमेश कुमार चावला आणि सिंधर सिंग गंगु या तीन एटीएम कोड करणाऱ्या चोरट्यांन तळेगाव दाभाडे पोलिसांनी गजाआड केलं आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: लखविरसिंग उर्फ लख्खा बलदेवसिंग, रमेश कुमार चावला आणि सिंधर सिंग गंगु या तीन एटीएम कोड करणाऱ्या चोरट्यांन तळेगाव दाभाडे पोलिसांनी गजाआड केलं आहे. यातील आरोपी हे अतिशय अत्याधुनिक पद्धतीने एटीएम  मध्ये चोरी करत असल्याच पोलिस तपासात उघडकीस आलं आहे. एटीएम मध्ये स्पाय कॅम्प सारख स्किरेट डिवाइस लावून त्या डिवाइसच्या माध्यमातून एटीएम मशीन मधिल कॅश ट्रे ठेवण्याचा पिनकोड हे आरोपी जाणून घेत असत. त्यानंतर एटीएम मध्ये कोणी नसताना आरोपी सिक्रेट पिन कोड नंबर टाकून एटीएम चा कॅश ट्रे उघडून त्यात कॅश चोरी करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

यातील एटीएम मध्ये चोरी करणारे हे तिन्ही आरोपी मुळचे पंजाबचे असून, ते एटीएम चोरी करण्यासाठी कार भाड्याने घेऊन वेगवेगळ्या राज्यात जाऊन एटीएम चोरी करून पसार होत असत. मात्र तळेगाव दाभाडे येथील एटीएम सेंटर मधील सुरक्षारक्षकाला एटीएम मशीन सेंटर मध्ये आलेल्या एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी ही बाब लगेच तळेगाव-दाभाडे पोलिसांना कळविली. त्यानंतर तळेगाव - दाभाडे पोलिसांनी अगदी काही मिनीटात या एटीएम मध्ये कॅश चोरी करणाऱ्या गँगला गजाआड केलं आहे. या चोरट्यांकडून तळेगाव दाभाडे पोलिसांनी पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील चार एटीएम फोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT