मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच आजून कायम असून आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय निर्णय़ होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. अध्यक्षपदाच्या निवडीकरिता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांकडून सतत राज्यपालांशी (Governer Bhagat Singh Koshyari) संवाद साधण्यात आला आहे. त्यासंदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला. मात्र, राज्यपालांनी आता अध्यक्षाची निवड ही घटनाबाह्य असल्याचे उत्तर दिले होते.
हे देखील पहा-
यानंतर परत एकदा राज्यपालांनी (Governer Bhagat Singh Koshyari) लिफाफा बंद पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी नेमके काय उत्तर दिले आहे, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राज्य सरकार (State Government) आता काय निर्णय घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यपालांची परवानगी नसताना निवडणूक घेणे अडचणीचे ठरू शकणार आहे. यामुळे राज्यपालांनी परवानगी दिल्यास निवडणूक घेता येऊ शकणार आहे. सध्या तरी अशी काही चिन्हे दिसत नाही. नियमांच्या बदलाचा प्रश्न देखील अनुत्तरीत आहेत. राज्यपालांच्या उत्तरात नेमके काय आहे हे समजल्यानंतरच पुढे काय हे स्पष्ट होणार आहे.
नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर वर्षभर अध्यक्षपद रिक्त आहे. नियम बदलून आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला विरोधी पक्षाने देखील विरोध दर्शवला होता. तर २७ आणि २८ डिसेंबरला निवडणूक घेण्याचा कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्यपलांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीमध्ये आवाजी मतदान घटननाबाह्य असल्याचे उत्तर राज्यपालांनी दिले आहे. राज्यपालांनी परवानगी न दिल्यामुळे सरकारने पत्र पाठवले, दरम्यान, राज्यपालांनी आता त्या पत्राला उत्तर पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष निवड कऱण्यावर ठाम आहे तर राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या परवानगी शिवाय निवड करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली आहे. यामुळे अध्यक्षपदाची निवड कशी होणार याची चर्चा सध्या होत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.