Ludhiana: कोर्ट ब्लास्ट हल्ल्याच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटक

पंजाब मधील लुधियाना येथे न्यायालयामध्ये बॉम्ब स्फोट झाला होता.
Ludhiana: कोर्ट ब्लास्ट हल्ल्याच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटक
Ludhiana: कोर्ट ब्लास्ट हल्ल्याच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटकSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : काही दिवसाअगोदरच पंजाब मधील लुधियाना येथे न्यायालयामध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. त्या प्रकरणामध्ये आता सुरक्षा यंत्रणांच्या हाती मोठे यश लागले आहे. त्या स्फोटाचा मास्टरमाइंड जसविंदर सिंग मुलतानी (Jaswinder Singh Multani) याला जर्मनीमधून अटक करण्यात आली आहे. मुलतानी आयएसआयच्या (ISI) सूचनेनुसार काम करत होता.

काही दिवसाअगोदर लुधियाना (Ludhiana) न्यायालयाच्या आवारामध्ये भीषण स्फोट (Explosion) झाला होता. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले होते. त्या स्फोटाच्या मास्टरमाइंडला अटक (Arrested) करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसविंदर सिंग मुलतानी लुधियाना आणि देशामधील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी (Terrorist) संस्थेचा सक्रिय सदस्य आहे. सध्या जर्मनी मधील यंत्रणा मुलतानीची चौकशी करत आहेत.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना बॉम्बस्फोटाची योजना पाक गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि पाकिस्तानस्थित (Pakistan) गँगस्टर हरविंदर सिंग रिंदाने यांच्याकडून आखण्यात आली होती. मुलतानची चौकशी करण्याकरिता भारतीय (Indian) तपास यंत्रणा लवकरच जर्मनीला जाऊ शकेल. पंजाब (Punjab) पोलिसांचा बडतर्फ हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग याला लुधियाना बॉम्बस्फोटामध्ये ह्युमन बॉम्ब म्हणून वापरण्यात आले होते.

मुलतानी दिल्ली आणि मुंबई मध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचे या तपासामध्ये समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आवाहनावरुन त्याला जर्मनीमध्ये अटक करण्यात आली आहे. खलिस्तान समर्थक असण्याबरोबरच मुलतानीवर पंजाब सीमेवरुन शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी पाकिस्तानमार्गे भारतामध्ये केल्याचे देखील आरोप आहे. रिंदा हा A+ श्रेणीमधील गँगस्टर आहे.

Ludhiana: कोर्ट ब्लास्ट हल्ल्याच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटक
ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न

पंजाबशिवाय महाराष्ट्र, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये तो वॉन्टेड आहे. त्याच्यावर १० खून, ६ खुनाचे प्रयत्न आणि ७ दरोडे याशिवाय शस्त्र कायदा, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी असे ३० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. २०१७ मध्ये रिंदा पोलिसांच्या हातून निसटला होता, त्यानंतर तो पाकिस्तानात गेल्याचे निष्पन्न झाले होते. लुधियानासह भारतातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटामध्ये मुलतानीचा सहभाग असल्याचा संशय सगळ्यांना आहे.

जसविंदर सिंग मुलतानी हा पंजाब मधील होशियारपूर येथील मुकेरियाचा रहिवासी आहे. १९७६ ला जन्म झालेल्या मुलतानीला २ भाऊ असून दोघेही जर्मनीमध्ये दुकान चालवतात आहेत. मुलतानी पाकिस्तानात गेला होता की नाही, याविषयी एजन्सी त्याच्याकडे चौकशी करत आहे. २४ डिसेंबरला लुधियाना कोर्टामध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या तपासानंतर गगनदीप सिंग असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गगनदीपला कोर्टाची रेकॉर्ड रुम उडवायची होती, असे पोलिसांनी (police) सांगितले. तो पंजाब पोलिसांचा बडतर्फ हवालदार आणि ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपीही होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com