Rupali Chakankar Saam Digital
मुंबई/पुणे

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर फरार, रुपाली ठोंबरेंच्या पोस्टनं खळबळ

Rupali Chakankar controversy latest news Maharashtra : रुपाली ठोंबरे पाटील यांच्या ‘रुपाली चाकणकर फरार’ या पोस्टनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरण, राजीनाम्याची मागणी आणि वाढत चाललेला वाद याचा सविस्तर आढावा.

Namdeo Kumbhar

Ashok Kharat Case Rupali Chakankar Latest News Update : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार असल्याची पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील कॅप्टन खरात प्रकरणी मागील दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावर मोठी टीका होत आहे. संजय राऊत, रूपाली ठोंबरे पाटील, सुषमा अंधारे यांनी चाकणकरांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यातच आता रूपाली ठोंबरेनी चाकणकर फरार असल्याची पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.

रूपाली पाटील ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा लक्ष केलेय. " राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार.बजाव टाली." अशी पोस्ट रूपाली पाटील यांनी केली आहे. या पोस्टमधून रूपाली पाटील यांनी खोचक दावा की खरेच चाकणकर गायब आहेत, अशी चर्चा पुण्यातील सोशल मीडियावर सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर येत नसल्याने रूपाली ठोंबरे यांनी अशी पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.

नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला पोलिसांनी बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कॅप्टन खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दीपक केसरकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो समोर आलेत... एवढंच नाही तर रुपाली चाकणकर या खरातची पाद्यपुजा करत असल्याचा व्हिडीओही समोर आलाय. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे विविध कार्यक्रमातील फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रुपाली चाकणकरांच्याच पक्षातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार...बजाव ताली...अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Okra Water Benefits: सलग ६ महिने भेंडीचे पाणी प्या, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT