गुन्हा दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांचं सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, 'मुस्कटदाबी... Saam Tv
मुंबई/पुणे

गुन्हा दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांचं सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, 'मुस्कटदाबी...

त्यांच्या वक्तव्यावरून आता शिवसेना (Shivsena) भाजपमध्ये (BJP) एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्याबद्दल वरळी सिलेंडर स्फोटप्रकरणात, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पेडणेकर यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip walse patil) यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. याच प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत मरीन ड्राइव्ह पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आशिष शेलार यांनी माझा आवाज कधी बंद होऊ देणार नाही असं म्हणत आपल्यावर लागू केलेला गुन्हा खोटा आहे असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. सांगितले आहे.

"सरकारी यंत्रणांचा गैरवापर";

याप्रकारणी आशिष शेलार म्हणाले, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे परंतु माझा आवाज कधी बंद होऊ देणार नाही असं आशिष शेलार म्हणले आहेत. यावेळी पुढे बोलत असताना ते म्हणाले, खोटी तक्रार, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया, खोटे प्रकरण आहे. या राज्यात पोलीस बाळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आहे. पण बदनामी साठी सत्तेचा दुरूपयोग करून हा एफआयआर केला आहे असे आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

सत्य बाहेर येईलच, पण…

ते पुढे म्हणले, मी कुठल्याही महिलेला अपमानास्पद, बदनामीकारक, छेडछाड गुन्हा केलेला नाहीय. दोन दिवस सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये दबावतंत्राचा वापर केला. सत्य बाहेर येईलच पण... अश्या प्रकारची मुस्कटदाबी करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन, भारतीय जनता पार्टी कधी दाबला नाही कधी झुकला नाही आणि आशिष शेलार चा तर सवालचं नाही. मी माझा संघर्ष अजून कडवा करेन. मी सर्व प्रकारची न्यायलयात लढाई लढेन. ही मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही.

नायर रुग्णालयातील प्रकारावरून शेलारांचा सवाल;

नायर मध्ये त्या बाळाचा उपचार का केला गेला नाही. पूर्ण परिवाराचा मृत्यू का झाला ? या प्रकारच्या लोकांना कोणत्या सोयीसुविधा मिळतात याबद्दल तुम्ही तोंड उघडणार आहेत का? तुमचा अहंकार मोठा? कि सामान्य मुंबईकरांचं मृत्यूचं दुःख हे संवेदनशील? हे सांगावं लागेल.

माझा न्यायव्यवस्थेवर, भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे. जी चौकशी करायची आहे करा. मी संपूर्ण सहकार्य करेन. आज ज्या पद्धतीने खोटा गुन्हा दाखल झालाय त्याला खऱ्या पद्धतीने न्यायालयीन प्रक्रियेने असलेली पावले मी उचलायला चाललो आहे. असे आशिष शेलार म्हणले. खऱ्या अर्थाने राज्यामध्ये स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि बोलण्याचं स्वातंत्र्य याबद्दल मुस्कटदाबी आहे. मी आता सर्व सांगणार नाही. असे शेलार यावेळी म्हणाले.

शिवसेना आणि मुंबई महानरपालिकेवर अतिशय गंभीर टीका;

दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी वरळी येथील बी. डी. डी. चाळीमध्ये गॅस सिलेंडर्सचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लहान बाळाचा मृत्यू झाला, लगोलग त्याच्या वडिलांचा व आईचाही मृत्यू झाला. या घटनेबाबत 4 डिसेंबर रोजी भाजप नेते ऍड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुंबई महानरपालिकेवर अतिशय गंभीर टीका केली होती.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी महापौर पेडणेकर यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शेलार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून आता शिवसेना (Shivsena) भाजपमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शेलार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जतच्या हालीवली गावात जादूटोण्याचा थरार, दोघांना पकडले अन्...; नेमकं काय घडलं? VIDEO

Infinix Hot 60 5G+: iQOO आणि Poco यांना टक्कर देणारा नवीन बजेट स्मार्टफोन

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडचा पायरी मार्ग बंद; आदेश जारी

Tejashri Pradhan: 'गालावर खळी, डोळ्यात धुंदी' तेजश्री प्रधानचे हे फोटो पाहून पागल व्हाल

सतत फोनवर बोलताना call disconnect होतोय? फॉलो करा हे हॅक्स

SCROLL FOR NEXT