Sharad Pawar And Ashish Shelar Saam TV
मुंबई/पुणे

MCA अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या गटाविरोधात आशिष शेलार मैदानात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या शर्यतीत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कारण भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार गटाकडून याआधीच संदीप पाटील यांनी अर्ज भरला आहे.

त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आशिष शेलार निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत असून 20 ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड (Milind Narvekar and Jitendra Awad) हे दोघेही एमसीए निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून नार्वेकर आणि आव्हाड यांनी स्वतंत्र अर्ज भरले आहेत. तर विहंग सरनाईक यांनी मुंबई प्रीमिअर लीगसाठी अर्ज भरला आहे.

एमसीएच्या निवडणुकीसाठी माजी आयसीसी आणि बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचा गट सज्ज झाला आहे. विविध पदांसाठी या गटाने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. त्यानुसार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत.

तर उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी यांचे नाव आहे. तर सचिव पदासाठी अजिंक्य नाईक सहसचिव पदासाठी गौरव पय्याडे आणि खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर हे निवडणूकीच्या मैदानात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT