Navab Malik & Ashish Shelar Saam TV
मुंबई/पुणे

Ashish Shelar ''नवाब अब बेनकाब हो गया है'', आशिष शेलारांची जहरी टीका

तपास यंत्रणांच्या कारवाईची उत्तरे देता येत नाहीत म्हणून काही पक्ष भाजप वर आरोप करत आहेत.

रामनाथ दवणे

मुंबई: आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने चौकशीसाठी कार्यलयात नेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते भाजपवरती आरोप करत आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते म्हणाले की तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात.

तपास यंत्रणांच्या कारवाईची उत्तरे देता येत नाहीत म्हणून काही पक्ष भाजप वर आरोप करत आहेत. त्यांना जर काही चुकीचं वाटलं तर त्यांना न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. तपास यंत्रणेच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही म्हणून भाजप वर आरोप केले जात असल्याचं शेलार म्हणाले. भाजप (BJP) अश्या आरोपांना घाबरत नाही. राज्याचे, मुंबईचे पोलीस (Mumbai Police) डोळे बंद करून आहेत का? जे काही सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे. दाऊद कुविख्यात आतंकवादी आहे, त्याचा पैसा कुठे वापरला जात आहे? दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांची चौकशी करायची नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

''नवाब अब बेनकाब हो गया है''

पुढे आशिष शेलार म्हणाले की शिवसेना, राष्ट्रवादीने तपासयंत्रनांवर दबाव आणू नये. जे काही सांगायचे आहे ते न्यायालयात सांगावे. भाजपवर आरोप करणे चुकीचे आहे. NIA काय काम करत आहे हे सर्वांना माहीत आहे. NIA, ED दाऊद च्या मालमत्तेचा तपास करत आहे. मालमत्ता खरेदीत लावलेल्या पैश्याचा तपास केला जात आहे. संजय राऊत यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचा ठेका दिला आहे का? असा सवाल शेलारांनी विचारला आहे. त्याचबरोबर आमच्या

अध्यक्षांच्या वर बोट दाखवतांना दहा वेळा विचार करा. आम्ही सहन करणार नाही. आपला सन्मान करतो पण यापुढे आम्ही सहन करणार नाही असेही शेलार म्हणले. नवाब अब बेनकाब हो गया है असे म्हणत त्यांनी मलिकांना टोमणाही मारला आहे. तपास यंत्रणांना त्यांचं काम करुद्या त्यांच्यावर दबाव टाकू नका असेही शेलार म्हणाले.

सेना-राष्ट्रवादीचा तपास यंत्रणांवर दबाव...

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा (Shivsena) यंत्रणांवर दबाव टाकत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आतंकवादाचे समर्थन करत आहेत का हे सांगावे? आपल्या सरकारला, सरकारी पक्षाला वाचविण्यासाठी यंत्रणांवर दबाव हल्ला केले जात आहेत. या राज्यात कायदा सुव्यस्थेची स्थिती आहे की नाही? बॉंब ब्लास्टचा आतंकवादी, पैश्याचा दुरुपयोग केला जात असल्याचे कळते. राजकारण करू नये देशहिताच्या मुद्द्यावर राजकारण नको. राजकारण केले तर हे लोकहिताचे होईल का? तपसयंत्रणा काम करेल, सत्य काय ते बाहेर येईल असे गंभीर टीका आशिष शेलार यांनी केली आहे. शरद पवार मोठे नेते आहेत त्यांना मी काय सांगणार. आतंकवादाला जात धर्म नसतो. मोठया नेत्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचंही शेलार म्हणले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

SCROLL FOR NEXT