Sant Tukaram Maharaj Palakhi Sohala 2024 Saamtv
मुंबई/पुणे

Ashadhi Wari 2024: तुकोबा रायांची पालखी ओढण्याचा मान गुलाब अन् मल्हारकडे, २६ बैलजोड्यातून झाली निवड; कुटुंबीय भरून पावले!

Sant Tukaram Maharaj Palakhi Sohala 2024: आषाढी वारीची चाहूल लागली असून रामकृष्ण हरीचा गजर करत लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने निघण्यासाठी आतुर आहेत. यंदा तुकोबा रायांची पालखी ओढण्याचा मान नांदेड येथील गुलाब- मल्हार जोडीला मिळाला आहे.

दिलीप कांबळे

पुणे, ता. १२ जून २०२४

जून महिना सुरू झाला की वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात. अलंकापुरी पंढरीमध्ये आषाढी एकादशीची तयारी सुरू झाली आहे. जगदगुरू संत तुकोबा रायांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान २९ जून रोजी होणार असून यावर्षी नांदेड गावातील गुलाब आणि मल्हार या जोडीला पालखी ओढण्याचा मान मिळाला आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यावर्षी ३३९ वा पालखी सोहळा होणार आहे. त्यासाठी जगतगुरु संत तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान पुण्यातील नांदेड गाव येथील कोरडे कुटूंबातील गुलाब आणि मल्हारला मिळालाय. निखिल कोरडे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते.

अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्याकडे दहा बैल असून त्यापैकी गुलाब आणि मल्हार आहेत. देहू संस्थांनकडे यावर्षी 26 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी निखिल कोरडे यांच्या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान मिळाल्याने कोरडे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दरम्यान, यावर्षी तुकोबा रायांचा 339 वा पालखी सोहळा असणार आहे. पालखीच्या रथाला जोडण्यासाठी दिमाखदार,ऐटबाज व देखण्या बैलजोडीची निवड करण्याचे आव्हान संस्थानपुढे होते. या बैलजोडीचे परिक्षण करताना संस्थानाची समिती प्रत्यक्ष अर्जदारांच्या दावणीला जाऊन बैलांचा रंग, शिंगे, खुर, क्षमता, ताकद, वशिंड,शेपटी, उंची, बैलाची चाल एकूणच या सर्वांचे परिक्षण करून बैल जोडीची निवड करण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT