Mumbai News: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाची सर्व विठ्ठल भक्तांना ओढ लागलेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात लांबच लांबला रांगा लागल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरासहित संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण झालं आहे. या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्त विठुरायांकडे खास मराठीत ट्विट करत प्रार्थना केली आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकानिमित्त नागरिकांना मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ' सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो'.
'भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल, अशी खास प्रार्थना नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची सपत्निक विठुरायांची शासकीय पूजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) या दाम्पत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली.
शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे घातले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.