आर्यन खान प्रकरणाला नवे वळण; गोसावीच्या बॉडीगार्डचा खळबळजनक खुलासा
आर्यन खान प्रकरणाला नवे वळण; गोसावीच्या बॉडीगार्डचा खळबळजनक खुलासा Saam TV
मुंबई/पुणे

Exclusive आर्यन खान प्रकरणात नवा खळबळजनक खुलासा (व्हिडिओ)

सुरज सावंत

मुंबई: के पी गोसावी अर्थात किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल ने खळबळजनक खुलासा केला आहे. ''साम'' च्या हाती प्रभाकर चे अँफीडेविट लागले आहे. समीर वानखडे क्रूझवर रेड टाकत असताना किरण गोसावीला बरोबर घेऊन गेले होते. रेड टाकल्यानंतर आर्यन खानला NCB ने ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी किरण गोसावी आणि सॅम नावाची व्यक्ती भेटली असल्याचे प्रभाकरने सांगितले. निळ्या मर्सिडीज कार मध्ये त्याची बोलणी झाली. त्यानंतर गोसावी वाशीला निघून गेला आणि बॉडीगार्ड प्रभाकरला ताडदेवला इंडियाना हॉटेल कडे जायला सांगितलं. तिथे 50 लाख कॅश घेऊन बॉडीगार्ड प्रभाकर वाशीला आला आणि पैसे गोसावीला दिले.

गोसावीच्या बोडिगार्डने हा खळबळजनक खुलासा केला आहे. गोसावी वाशील राहत होता तिथेच प्रभाकरही राहत होता. 2 ऑक्टोबर रोजी 500 रुपये देऊन गोसावीने प्रभाकरला CST स्थानकात बोलवलं होत. त्यानंतर हे NCB कार्यालयात होते. 27 सप्टेंबर ला किरण गोसावी अहमदाबाद ला गेला होता, असा खुलासा प्रभाकरने केला आहे. तेथून येऊन तो मुंबईत NCB अधिकाऱ्यांना भेटला. गोसावीने सॅम नावाच्या व्यक्तीला 38 लाख देण्यास बॉडीगार्ड प्रभाकरला सांगितले होते. त्या दिवसानंतर गोसावी गायब असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे बॉडीगार्ड प्रभाकरने भीती व्यक्त केली आहे.

ज्यावेळी समीर वानखेडे क्रुझवर रेड करण्यासाठी गेले त्यावेळी किरण गोसावी त्यांच्याच गाडीतून गेला, असेही साईलने अॅफिडेव्हिटमध्ये नमूद केले आहे. आपण जे पैसे किरण गोसावीला दिले ते पैसे त्याने त्या सॅम नावाच्या व्यक्तीला दिल्याची माहिती साईलने अॅफिडेव्हिटमध्ये दिली आहे. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात नेताना गोसावी अधिकाऱ्यांबरोबरच होता, एनसीबी कार्यालयात किरण गोसावी याने मला पंच म्हणून सह्या करण्यास सांगितल्या असेही साईलने सांगितले आहे. त्यावेळी कोऱ्या कागदावर आपल्या सह्या घेण्यात आल्या असेही साईलचे म्हणणे आहे. आता गोसावी गायब असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही प्रभाकर साईलने आपल्या अॅफिडेव्हिटमध्ये व्यक्त केली आहे.

पहा याबाबत संजय राऊत काय म्हणतात ते.....

दरम्यान एनसीबीने कारवाईसाठी 9 जणांना पंच केलं होतं. त्यामध्ये प्रभाकर साईल, किरण गोसावी (के पी गोसावी), मनीष भानुशाली, औब्रे गोमेझ, आदिल उस्मानी, व्ही वैगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुझमिल इब्राहिम अशी नऊ जणांची नावे आहे. मंत्री नवाब मलिका आणि समीर वानखेडे यांच्यात मागच्या काही दिवसांत वाक युद्ध सुरु आहे. मलिकांनी वानखेडेंवर पुराव्यानिशी काही आरोप केले त्यानंतर त्या आरोपांचे खंडन वानखेडेंनी केले आहे. परंतु आता प्रभाकरच्या या खुलाशाने या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Today's Marathi News Live: भाजपच्या मुलुंड कार्यालय तोडफोड प्रकरण, शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video

kiara Advani : पागल करते कियाराची मोरनीशी चाल

SCROLL FOR NEXT