Video: ''किरण गोसावी, मनिष भानुषाली यांचा मुख्य सुत्रधार सुनिल पाटील''
Video: ''किरण गोसावी, मनिष भानुषाली यांचा मुख्य सुत्रधार सुनिल पाटील'' Saam TV
मुंबई/पुणे

Video: ''किरण गोसावी, मनिष भानुषाली यांचा मुख्य सुत्रधार सुनिल पाटील''

सुरज सावंत

मुंबई ड्रग्स केसमध्ये आता सुनिल पाटील नावाच्या पात्राने उडी घेतली आहे. भाजपाचे मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेवून सुनिल पाटील आणि नवाब मलिक यांच्या मोठे आरोप केले आहेत. एनसीबीवर आरोप हे मलिकांचे नवाब मलिकांचे षडयंत्र आहे. आतापर्यंत या प्रकरणी अनेकांची नावं समोर आली आहेत आणि त्यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. हे आरोप करताना किरण गोसावी, प्रभाकर साईल किंवा मनिष भानुषाली यांची नावे या अगोदरच समोर आली आहेत. मात्र यांचा मुख्य सूत्रधार सुनिल पाटील असून तो राष्ट्रवादीशी संबंधित आहे असा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला. भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आर्यन खानसोबतचा तो किरण गोसावीच्या फोटो, तसंच आर्यनला घेऊन जात असलेले फोटो त्यांनी दाखवले. तसंच किरण गोसावी हा भाजपशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र कोण किरण गोसावी, मनिष भानुषाली कोण, ड्रग्ज प्रकरणाशी त्यांचे संबंध कसे? हे सांगताना या सर्व गोष्टींमागचा मुख्य सूत्रधार सुनिल पाटील असल्याचं मोहित कंबोज यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुनिल पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबधित असल्याचं कंबोज यांनी सांगितलं. त्याचे ३० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलाचे ते खास मित्र असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. राज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या तो घरचा सदस्य आहे असा दावाही मोहित कंबोज यांनी केला.

मी कोणतेही आरोप करत नाही तर सत्य सांगत आहे असं म्हणत मोहित कंबोज यांनी म्हटलं की, अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईमध्येही सुनिल पाटीलचा संबंध आहे. १९९९ पासून २०१४ पासून सुनिल पाटील आणि त्यांची गँग सक्रीय होती. २०१४ ला सरकार बदलल्यानंतर सुनिल पाटील अंडरग्राउंड झाला. सरकार पुन्हा आल्यानंतर त्याची गँग कामाला लागली. बदलीचे रॅकेट असेल किंवा इतर गोष्टी यातही सुनिल पाटील याता हात असल्याचे तसेच महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांशी त्याचे संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.

आर्यन खान प्रकरण आणि सुनील पाटील

सुनिल पाटीलने सॅम डिसूझाला व्हॉटसअॅप मेसेज आणि कॉल देखील केले. माझ्याकडे २७ लोकांची यादी आहे आणि तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांची यासंबंधी माहिती द्या. मला त्यांना सांगायचे आहे असं सॅम म्हणाला. सॅम डिसूझाने एनसीबीमधील व्ही व्ही सिंग यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील ड्रग्ज आणि क्रूज पार्टीची माहिती त्यांना दिली आणि पुन्हा सुनिल पाटीलला व्हीवी सिंग यांच्याशी बोलणं झालं हे सांगितलं. अनेक खुसाले या पत्रकार परिषदेमधून कंबोज यांनी केले आहे. त्याचबरोबर आता काही फोटो समोर आले त्यात सुनिल पाटील हा अनेक भाजपच्या मंत्र्यांसोबत दिसत आहे. नवाब मलिक उद्या पत्रकार परिषद घेवून या सर्व प्रकरणाचा खुलासा करणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात दुचाकीवर तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Jalana News: ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव... जोरदार घोषणाबाजी; जालन्यात काय घडलं?

Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

Mango Health Benefits: उन्हाळ्यात दररोज खा एक कच्चा आंबा; होतील जबरदस्त फायदे

Jalna Lok Sabha: मनोमिलन झालं, मतभेद मिटले! रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी अर्जून खोतकर उतरले मैदानात

SCROLL FOR NEXT