एका लग्नाची अनोखी पद्धत; जाणून घ्या काय आहे भानगड  Saam Tv
मुंबई/पुणे

एका लग्नाची अनोखी पद्धत; जाणून घ्या काय आहे भानगड

सध्या डोंबिवलीमध्ये मात्र एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण हा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीनं पार पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोरोना Corona संकट आणि त्यामुळे लागू झालेल्या बंधनामुळे अनेकांचे विवाह सोहळे Wedding रखडले आहेत. सध्या डोंबिवलीमध्ये मात्र एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण हा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीनं पार पडला आहे. या लग्नामध्ये वधू - वर चक्क साता समुद्रा पार कॅनडाला Canada होते. मात्र वराच्या वडिलांनी पुढाकार घेतला आणि डोंबिवलीहून Dombivali भटजीच्या मदतीने व मोजक्या नातेवाईकांच्या ऑनलाइनपद्धतीने Online आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा संपन्न केला. ऑनलाईन पद्धतीने मंगलाष्टका व सर्व विधी देखील पार पडले आहे. इतकच नाही तर अक्षता सुद्धा ऑनलाईन टाकण्यात आल्या. या विवाहात नातेवाईकांनी युट्युब You Tube आणि फेसबुक Facebook पेजच्या लिंकद्वारे लग्नाला उपस्थिती लावली होती. Arranged Online marriage from Canada on video call

डॉ. हिरामण चौधरी यांच्या मुलाचे लग्न होते डोंबिवली पुर्वेकडील भोपर गाव परिसरात ते राहण्यासाठी होते. डोंबिवली मध्ये लहानाचा मोठा झालेल्या भूषणने सात वर्षा पूर्वी उच्चशिक्षणासाठी कॅनडा येथे जाण्याचा निर्णय घेतला .भूषण कॅनडा ला सात वर्षा पूर्वी गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला तेथेच नोकरी लागली. नोकरीमुळे तो तेथेच म्हणजे कॅनडात स्थायिक झाला. हरदीप कौर या तरुणीशी याच दरम्यान त्याचे तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. आपल्या कुटुंबाला विवाहाबद्दल दोघांनीही इच्छा बोलून दाखवली.

हे देखील पहा -

चौधरी व कौर कुटुंबाने देखील या दोघांना विवाहाची परवानगी दिली खरी. मात्र २०२० पासून कोरोनामुळे त्यांना भारतात लग्नासाठी येताच येत नव्हते. तर त्यांच्या कुटुंबियांना कॅनडा जाता येत नव्हते. मुलांचा ऑनलाइन विवाह Online Wedding करण्याचं अखेर या दोन्ही कुटुंबांनी आपल्या ठरवले.

कुरियरच्या माध्यमातून भूषणला कॅनडा Canada येथे लग्नासाठी लागणारे सर्व सामान घरपोच करण्यात आले. त्यानंतर डोंबिवली येथील ठरलेल्या मुहूर्तावर चौधरी कुटुंबाच्या घरी भटजी आले. नातेवाईकाची गर्दीविवाह ऑनलाइन होणार असल्यानं नव्हती. ऑनलाइन लाईव्ह व्हिडियोच्या माध्यमातून भटजीनी कॅनडा येथे असलेल्या भुशन व हरदीला लग्नाचे विधी सांगितले आणि त्या प्रमाणे ते त्यांच्याकडून करवून घेतले.

कॅनडा येथे राहत असलेल्या भूषण व हरदीपचा डोंबिवली येथून ऑनलाईन विवाह अखेर संपन्न झाला. नातेवाइकांनी व चौधरी कुटुंबाच्या मित्रपरिवाराने नववधू वर यांना ऑनलाइनच आशीर्वाद दिले. सध्या या एकालग्नाच्या अनोख्या पद्धतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT